`आॅक्टोबर हीट`ने वाढली पाणीटंचाई

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   : राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेल्याने ‘ऑक्टोबर हीट’ वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात पाणीटंचाईने डोके वर काढले असून, औरंगाबाद, नाशिक, पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा वाढतच आहेत. सोमवारपर्यंत (ता. ८) राज्यातील ११ जिल्ह्यांमधील ३४२ गावे ४९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भासत असून, ३५४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सांगण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई अधिक असून, गेल्या वर्षी याच वेळी (ता. ९) राज्यातील १३८ गावे आणि १०७ वाड्यांना ९० टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.

यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबर महिना कोरडाच गेला. त्यामुळे पाण्याची मागणी वाढू लागल्याने धरणांमधून पाणी सोडावे लागत आहे. यंदा धरणांमध्ये गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी पाणीसाठा असतानाच सप्टेंबरमधील पावसाच्या ओढीने पाणीसाठ्यात घट होऊ लागली आहे. कोरडवाहू पट्ट्यामध्ये मॉन्सूनने दडी मारल्यानंतर परतीच्या पावसानेही समाधानकारक हजेरी लावलेली नाही. त्यामुळे पिण्याचे पाण्याचे स्रोत आताच तळाशी गेले असल्याने पाणीटंचाईची समस्या वाढत आहेत. औंरगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक झळा बसत असून, नाशिक, नगर, जालना, पुणे, सातारा जिल्ह्यांत पाणीटंचाई वाढत आहे.

मराठवाड्यातील अौरंगाबाद विभागात १७५ गावे, ३ वाड्यांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी सर्वाधिक १९८ टॅंकर सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १५३ गावांसाठी १६० टॅंकर सुरू असून, नांदेड आणि बीड जिल्ह्यात नव्याने टॅंकर सुरू करावे लागले आहेत. नाशिक विभागात १३५ गावे, ३७३ वाड्यांना १२५ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर पुणे विभागातील २२ गावे १२२ वाड्यामध्ये २२ टॅंकरने, आणि अमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील १० गावांना ९ टॅंकरने पाणी देण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

साेमवारपर्यंत (ता. ८) जिल्हानिहाय पाणीटंचाई स्थिती
जिल्हा   गावे  वाड्या टॅंकर
नाशिक ५८ १७८ ५३
धुळे  ८  ० 
जळगाव १७  ११
नगर   ५२  १९५  ५४
पुणे   ७  ५७  ९
सातारा   १५   ६५  १३
अौरंगाबाद   १५३ १६०
जालना २०  २  ३५
बीड     १  ० 
नांदेड    १
बुलडाणा १०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com