कवठेमहांकाळमध्ये पाणीसाठ्यात घट

कवठेमहांकाळमध्ये पाणीसाठ्यात घट
कवठेमहांकाळमध्ये पाणीसाठ्यात घट

सांगली  ः उन्हाळा सुरू झाला, मार्च महिना आला आणि महिन्याच्या प्रारंभीच कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या तलावातील पाणीसाठा कमी होतो आहे. तालुक्‍यातील दहा लघू व एक मध्यम प्रकल्पापैकी चार तलावांतील पाणीसाठा पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाला आहे.  कवठेमहांकाळ तालुक्‍यात दहा लघू व एक मध्यम प्रकल्प आहेत. तालुक्‍यात दरवर्षी पाणी टंचाई असतेच. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या वर्षी तालुक्‍यात ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी व जोरदार पावसाने तालुक्‍याच्या घाटमाथ्यावरील घाटनाद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापूर, जाखापूर, कुची व परिसरासह तालुक्‍यात विहिरी, बंधारे व तलावात चांगला पाणीसाठा झाला. त्यामुळे त्याचा फायदा द्राक्ष व अन्य पिकांसाठी झाला. गेली चार-पाच महिने घाटमाथ्यासह तालुक्‍याचा पाणीप्रश्न मिटण्यास मदत झाली.  दरम्यान, त्यानंतर जानेवारी महिन्यापासून तालुक्‍यातील तलावाबरोबर बंधारे, विहिरीतील पाणीसाठा हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यापासून पाणीटंचाई अधिक तीव्र होऊ लागली आहे.  तालुक्‍यातील दहा लघू व एक मध्यम प्रकल्पापैकी लांडगेवाडी, बोरगाव, हरोली व नांगोळे या चार तलावांत ५० टक्‍क्‍ंयापेक्षा कमी पाणी साठा आहे. उर्वरित सात तलावांत समाधानकारक पाणीसाठा आहे. तलावात पाणी साठा समाधानकारक असला तरी शिल्लक पाणी एक महिनाभर पुरेल अशी स्थिती आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्‍यता असल्याने द्राक्ष, डाळिंब या पिकासह अन्य पिकांना टॅंकरद्वारे पाणी द्यावे लागणार  आहे.  तलावनिहाय पाणीसाठा पुढीलप्रमाणे (पाणीसाठा द.ल.घ.फू.मध्ये)  कुची ४९.१४, रायवाडी ७३.९५, लांडगेवाडी ५.०९, लंगरपेठ ५७.६७, नांगोळे २२.५४,  बोरगाव १५.८४, हरोली ८.६४, दुधेभावी ११९.०३, घोरपडी ४१.८४, बंडगरवाडी  ३६.६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com