खानदेशातील पाणीटंचाई तीव्र

खानदेशातील पाणीटंचाई तीव्र
खानदेशातील पाणीटंचाई तीव्र

जळगाव : हिवाळा संपला असतानाच खानदेशात पाणीटंचाई तीव्र होत आहे. अनेक मोठ्या गावांमध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात सद्यःस्थितीत सुमारे ८५ टॅंकर सुरू आहेत. पुढील १५ ते २० दिवसांत ही संख्या शंभरीपार पोचेल, अशी स्थिती आहे. जेथे कुठलेही पाण्याचे स्राेत नाहीत, अशा गावांमधून टॅंकरचे प्रस्ताव वाढू लागले आहेत, अशी माहिती मिळाली. 

जळगाव जिल्ह्यात सुमारे ४३ गावांमध्ये तात्पुरत्या योजनांबाबत काम झाले. जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तात्पुरत्या योजनांसाठी सर्वत्र कार्यरत आहे. सातपुडा पर्वतालगतच्या गावांमध्येही यंदा टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी येत असल्याने ग्रामपंचायतींनी तात्पुरत्या योजनांची मागणी केली. परंतु भूगर्भात पाणी नसल्याने विहीर खोलीकरण, कूपनलिका तयार करूनही पाणी मिळत नसल्याची अडचण आहे. यामुळे टॅंकरशिवाय पर्याय नसल्याची स्थिती भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, जामनेर व बोदवडमधील काही गावांमध्ये आहे. 

जळगाव जिल्ह्यात मागील महिन्यातच ४० टॅंकर सुरू होते. त्यात किरकोळ वाढ झाली. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे व साक्री तालुक्‍यांत पाण्याची समस्या तीव्र होत आहे. जी गावे तापी काठी आहेत, तेथे स्थिती बरी असली तरी पांझरा काठावरील २३ गावांमध्ये पाण्याचे संकट आहे.

धुळे जिल्ह्यात सुमारे २१, नंदुरबारात सुमारे २३ टॅंकर सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. नंदुरबारमधील ३१ गावांमध्ये टंचाई स्थिती तीव्र असून, त्यात नंदुरबार शहरापासून नजीक असलेल्या पळाशी, धमडाई, कोळदे, बामडोद, लहान शहादे, भालेर, रनाळे, तिसी, नाशिंदा आदी गावांचा समावेश आहे.  नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्‍याचा पूर्व भाग व नंदुरबार तालुक्‍यात टंचाई वाढली आहे.

नंदुरबारातील मिरची पिकाला पाणीटंचाईचा फटका मागील दोन महिन्यांत बसल्याने पीक काढून फेकावे लागले. जलस्राेत आटत असल्याने टॅंकरची संख्याही पुढे वाढू शकते, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com