agriculture news in marathi, water shortage in laoki, pune, maharashtra | Agrowon

लौकी येथील सहा बंधारे कोरडेठाक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जून 2019

महाळुंगे पडवळ, जि. पुणे   : लौकी (ता. आंबेगाव) येथील सहा बंधारे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी संपुष्टात आले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर टॅंकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महाळुंगे पडवळ, जि. पुणे   : लौकी (ता. आंबेगाव) येथील सहा बंधारे कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी संपुष्टात आले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर टॅंकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मागील वर्षी लौकी गावात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच या गावाला पाणीटंचाई जाणवू लागली होती. डिंभे धरणातून डाव्या कालवा घोडशाखेतून सोडल्या जाणाऱ्या पाण्यावरच गावचा पाणीपुरवठा अवलंबून होता. परंतु, या वर्षी लौकी गावाला पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यात आले नाही. बंधारेही पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणीवाटपाचे व्यवस्थित नियोजन केले नाही. बंधाऱ्यानजीक गावाला नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीतील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. गावाला चार दिवसांतून वीस मिनिटे पाणी सोडले जाते. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होऊन लौकी गावाला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. प्रशासनाने गावाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे, असे उपसरपंच गजाबा थोरात यांनी सांगितले.

सरपंच संदेश थोरात म्हणाले, "अनेक शेतकऱ्यांनी कळंब येथील घोडनदीवरुन उपसा सिंचना योजना राबविल्या आहेत. परंतु कळंब येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी राखून ठेवण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विद्युत मोटारीचे कनेक्‍शन तोडले आहे. त्यामुळे पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. पंचक्रोशीतील ६० विहीर व बोअरवेलमधील पाणीपातळी पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे घोडेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात गावाला टॅंकर सुरू करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने सादर केला आहे.''


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...