मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; ३७८ प्रकल्प कोरडे

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; ३७८ प्रकल्प कोरडे
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; ३७८ प्रकल्प कोरडे

औरंगाबाद : मराठवाड्यातील  कोरडेठाक पडलेले ३७८ व जोत्याखाली गेलेल्या ३३६ लघु, मध्यम प्रकल्पांमुळे पाणीटंचाईची भीषणता वाढली आहे. वेळेत पावसाळ्याला सुरवात न झाल्यास पाणीटंचाईचं हे स्वरूप अधिकच भीषण होण्याची चिन्ह आहेत. मराठवाड्यातील ३७८ लघू व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामध्ये ३४६ लघु व ३२ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.  

३४६ लघु प्रकल्प कोरडे  मराठवाड्यातील एकूण ७४९ लघू प्रकल्पांचा आढावा घेता औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघु प्रकल्पांपैकी ६९ प्रकल्प कोरडेठाक पडले असून १३ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पांपैकी ४७ प्रकल्प कोरडे पडले असून ८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. बीड जिल्ह्यातील १२६ प्रकल्पांपैकी ८९ प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. तर २६ प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे. लातूर जिल्ह्यातील १३२ प्रकल्पांपैकी ३९ कोरडे पडले असून ८० मधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील २०५ प्रकल्पांपैकी १०२ प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. ७५ प्रकल्पातील पाणी जोत्याखाली गेले आहे. पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी राहिलेल्या नांदेड जिल्ह्यातील ८८ प्रकल्पांपैकी ६४ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पांपैकी १९ मधील पाणीसाठा जोत्याखाली गेला असून हिंगोलीतील २६ पैकी २३ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. 

८ मोठे प्रकल्प कासावीस मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प उपयुक्‍त पाण्याविना कासावीस झाली आहेत. जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना व सिनाकोळेगाव या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. 

३२ मध्यम प्रकल्प कोरडे मराठवाड्यातील ३२ प्रकल्प कोरडेठाक  पडले आहेत. त्यामध्ये औरंगाबादमधील ११, जालना ३, बीड ९, लातूर १, उस्मानाबादमधील ८ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. २८ मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील ३, जालना ४, बीड ६, लातूर ४, उस्मानाबाद ६, नांदेड ३, परभणीच्या २ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

प्रकल्पनिहाय उपयुक्‍त पाण्याची टक्‍केवारी
प्रकल्प संख्या उपयुक्‍त पाण्याचा टक्‍का
मोठे प्रकल्प ११ १.९४
मध्यम ७५ १.५१
लघु ७४९ १.८७
गोदावरी बंधारे १३ ०.४०
तेरणा, मांजरा, रेणा २४ ०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com