agriculture news in marathi, water shortage may occur, kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

कोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. नद्यांबरोबर अनेक तलावांत जेमतेम काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

कोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. नद्यांबरोबर अनेक तलावांत जेमतेम काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यात असणाऱ्या ४४७ तलावांपैकी २२२ तलाव कोरडे पडले आहेत. ज्या १९३ तलावांमध्ये पाणी आहे, त्यामध्येदेखील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या तलावांमध्ये पाणीसाठा चांगला आहे. राहिलेल्या तलावांमध्ये १५ ते २० टक्केच पाणीसाठा आहे. चंदगड तालुक्यातील सर्वाधिक ६० तलाव कोरडे आहेत. या तालुक्यात ८५ तलाव आहेत. याशिवाय आजरा तालुक्यातील २५, भुदरगडमधील ११, गगनबावडामधील ६, गडहिंग्लजमधील ३५, हातकणंंगलेमधील २२, कागलमधील २६, करवीरमधील १५, पन्हाळ्यातील ३३, राधानगरीमधील ८, शाहूवाडीमधील ९ व शिरोळ तालुक्यातील १४ तलावांमध्ये पाणी नाही.

अनेक विहिरींमधील पाणीपातळी खाली गेली आहे. टंचाईग्रस्त गावात पर्यायी पाणीपुरवठ्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विहिरीत पारा मारणे, विहीर फोडणे, गाळ काढणे, कूपनलिका खोदणे आदी प्रयत्न शेतकऱ्यांकडून सुरू आहेत. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळणार आहे. परंतु, आर्थिक परिस्थिती नसतानाही पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने या कामांसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

एका बाजूला कडक ऊन आणि दुसरीकडे एकही वळीव पाऊस नसल्याने तहानलेल्या पिकांसाठी अधिक उपसा झाल्याने अनेक नद्या कोरड्या पडत आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाऊस सुरू होईपर्यंत शेती आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे पाटबंधारे विभागापुढे आव्हान ठरत आहे. 
नियोजनात बदल केला असला तरी गतवेळीइतकाच साठा यंदाही शिल्लक आहे. उलट, यंदा उसाचे वाढलेले क्षेत्र, वळीव नाही, त्यातच कडक उन्हाचा मारा, वाढलेले बाष्पीभवन यामुळे पाणी अधिक लागले. गतवर्षीपेक्षा यंदा उपसा कालावधीही जास्त होता, म्हणून पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून शेतीला पाण्याचा ताण सहन करावा लागत असल्याने याचा परिणाम उसावर होत आहे. वेळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने ऊस शेती तहानलेली राहत आहे. वळीव पाऊस नसल्याने पिकांना पाण्याची जादा गरज लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...
परभणीत शेवगा ३५०० ते ५००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
उन्हाळ कांद्याचा आलेख चढाचनाशिक : मागील दोन आठवड्यांपासून उन्हाळ कांद्याची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...