Agriculture news in marathi, Water shortage persisted in the three talukas of Satara | Agrowon

साताऱ्यातील तीन तालुक्यांत पाणीटंचाई कायम
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

सातारा : गेल्या दोन दिवसांत माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाली. तरीही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. गेल्या महिन्यात अवघा एक टँकर कमी झाला आहे. माण, खटाव या दोन तालुक्यांतील ८२ गावे, ६२४ वाड्या-वस्त्यांवर १०१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

सातारा : गेल्या दोन दिवसांत माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाली. तरीही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. गेल्या महिन्यात अवघा एक टँकर कमी झाला आहे. माण, खटाव या दोन तालुक्यांतील ८२ गावे, ६२४ वाड्या-वस्त्यांवर १०१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे कराड, पाटण तालुक्यांत अनेक गावांत महापूर आला. त्यातून कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. मात्र माण, खटाव तालुक्यांत टंचाई असलेल्या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीटंचाई कमी झाली नाही. 

गेल्या दोन दिवसांत या माण, खटाव, फलटण तालुक्यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस होऊन पाणीटंचाई कमी झाली नाही. गेल्या महिन्याभरात एकूण टँकरच्या संख्येत अवघा एका टँकर कमी झाला. टँकर सुरू असलेल्या गावात अपेक्षित पाऊस होत नसल्यामुळे टंचाई परिस्थिती जैसे थे आहे. सध्या माण, खटाव व फलटण या तीन तालुक्‍यांतील ८२ गावे, ६२४ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४३ हजार ९४१ जनतेस १०१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये माण तालुक्‍यातील ७१ गावे व ५६७ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ३५ हजार ४२ जनतेस ९६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

खटाव तालुक्‍यातील आठ गावे, ३९ वाड्या-वस्त्यांवरील ४९२१ ग्रामस्थांना तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. फलटण तालुक्‍यातील तीन गावे व १८ वाड्या-वस्त्यांना दोन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील ३७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ३१, खटावमधील सहा विहिरींचा समावेश आहे.

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...