agriculture news in marathi, Water shortage problem in Khandesh is horrifying | Agrowon

खानदेशात पाणीटंचाईची समस्या भीषण
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

जळगाव : खानदेशातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्‍यात १२ गावांमध्ये टंचाईस्थिती वाढत आहे. पावसाअभावी विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी न वाढल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावांत स्रोत उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.

जळगाव : खानदेशातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस भीषण होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्‍यात १२ गावांमध्ये टंचाईस्थिती वाढत आहे. पावसाअभावी विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी न वाढल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अनेक गावांत स्रोत उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.

धुळे जिल्ह्यात टॅंकरची संख्या कमी दिसत असली तरी अनेक गावांमध्ये पिण्याचे व घरगुती वापरासाठी पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, जामनेर व बोदवड तालुक्‍यात समस्या वाढू लागली आहे. अमळनेर तालुक्‍यात नगाव, मंगरूळ, जानवे आदी भागांत पुढे समस्या तीव्र होईल. शेतशिवारातही अशीच स्थिती आहे. जामनेर तालुक्‍यातील पळासखेडे मिराचे, रोटवद भागात समस्या वाढेल, अशी स्थिती आहे. पाचोरा तालुक्‍यातील लोहारा व परिसरातही पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होण्याचे संकेत आहेत. जळगाव जिल्ह्यात १२ टॅंकर सुरू आहेत. सर्वाधिक १० टॅंकर अमळनेर तालुक्‍यात सुरू आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातील धमडाई, पथराई, पळाशी, कोळदे, लहान शहादे, कोठली, खोंडामळी, तिसी, चौपाळे भागात जलसंकट वाढण्याची भिती आहे. कोळदे येथे गावशिवारातील विहिरींवरून पिण्यासाठी पाणी आण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

जूनमध्ये धुळे व जळगावच्या पश्‍चिम भागातील पारोळा, अमळनेरात काही ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमध्ये झालेला जलसंचय आटला आहे. ऑगस्टमधील पाऊस भिज स्वरुपाचा होता. जोरदार पाऊस कुठेही झाला नाही. गिरणा, वाघूर, अंजनी, कांग, बोरी, पांझरा आदी नद्यांचा चांगला प्रवाह आला नाही. पांझरा नदीतून मध्यंतरी काही दिवस पाण्याचा प्रवाह सोडला होता. पण तोदेखील बंद झाला आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व साक्री भागात, जळगाव जिल्ह्यातील पारोळा, पाचोरा, भडगाव, जामनेर, अमळनेर, धरणगाव भागात, तर नंदुरबारमधील नंदुरबार, शहादा तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये जलसंकट आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...