पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; जनावरांसाठी छावणीही सुरू

पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; जनावरांसाठी छावणीही सुरू
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; जनावरांसाठी छावणीही सुरू

पुणे : उन्हाचा चटका वाढताच पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई चांगलीच भडकली आहे. पुरंदर तालुक्यात चाराटंचाई वाढल्याने जनावरांसाठी एक खासगी छावणी सुरू करावी लागली अाहे. जिल्ह्यातील १३ पैकी ९ तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा वाढल्याने ४२ गावे आणि ४९१ वाड्यांना ७८ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे. सुमारे दीड लाख लोकांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे. 

पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात असलेले भोर, मावळ, मुळशी, वेल्हा हे चार तालुके वगळता उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये पाणीटंचाई वाढली अाहे. बारामती तालुक्यातील सर्वाधिक १३ गावे १९४ वाड्यांमधील ४३ हजार लोकसंख्येला २१ टॅंकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. त्यापाठोपाठ शिरूर तालुक्यातील ६ गावे, ५७ वाड्यांमधील ३७ हजाराहून अधिक लाकांना पाणीपुरवठा करण्यासाठी १७ टॅंकर सुरू आहेत. तर आंबेगाव तालुक्यातील ८ गावे ३४ वाड्यांना १२ टॅंकरने पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. 

दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, पुरंदर तालुक्यातही कमी अधिक प्रमाणात टॅंकर सुरू करावे लागले अाहे. टंचाईग्रस्त भागातील पाणीपुरवठ्यासाठी २६ विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले अाहे. पुरंदर तालुक्यात पाण्याबरोबरच चाराटंचाईदेखील वाढली अाहे. नावळी येथे भारतीय किसान संघाच्या वतीने खासगी छावणी सुरू करण्यात आली असून, तेथे ५० जनावरांचे सध्या संगोपन केले जात आहे. 

नावळी येथे सुरू केलेल्या छावणीमध्ये १६५ जनावरांची नाेंदणी झाली असून, सध्या ५० जनावरांचे संगोपन करण्यात येत आहे. शासकीय मदतीशिवाय हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. जनावरांना पुरेसा चारा आणि पाणी देता यावे म्हणून, वेगवेगळ्या संस्थांकडे मदतीचे आवाहन केले आहे. मदत मिळताच जनावरांची संख्या वाढविण्यात येईल. - सागर जगताप, प्रकल्प संचालक, बलराम चारा छावणी, नावळी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com