agriculture news in Marathi, Water shortage in Pune division is more intense | Agrowon

पुणे विभागातील पाणीटंचाई अधिक तीव्र
टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

पुणे : विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई अधिकच तीव्र होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच या चार जिल्ह्यांच्या २६ तालुक्यांमधील १९८ गावे १३२२ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २०० टॅंकर सुरू करावे लागले आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने विभागातील सुमारे ४ लाख २१ हजार लोकसंख्या आणि २७ हजार जनावरांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

पुणे : विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई अधिकच तीव्र होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच या चार जिल्ह्यांच्या २६ तालुक्यांमधील १९८ गावे १३२२ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २०० टॅंकर सुरू करावे लागले आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने विभागातील सुमारे ४ लाख २१ हजार लोकसंख्या आणि २७ हजार जनावरांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

पुणे जिल्ह्यात ८ तालुक्यांना झळा
पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील ३२ गावे ३६८ वाड्यांमध्ये टंचाई असून, १ लाख १२ हजार लोकसंख्येला ३२ टॅंकरच्या साह्याने पाणी पुरवठा केला जात आहे. शिरूर आणि बारामती तालुक्यात सर्वाधिक झळा बसत आहेत. दौंड, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, इंदापूर, खेड तालुक्यातही पाणीटंचाई वाढत आहे. 

माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई
सातारा जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात असेलेल्या माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या चार तालुक्यांमध्ये पाणीटंचाई वाढली आहे. जिल्ह्यातील ६२ गावे ३५३ वाड्यांमध्ये ५५ टॅंकर सुरू आहेत. यात माण तालुका विभागातील सर्वाधिक टंचाईग्रस्त असून, तेथे ४४ गावे, ३३३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ टॅंकर सुरू आहेत. माण तालुक्यातील ७४ हजारांहून अधिक लोकसंख्या आणि २१ हजारहून अधिक जनावरांना टॅंकरची मदत घ्यावी लागत आहे. खटाव आणि फलटण तालुक्यातही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 

सांगली जिल्ह्यात ६६ टॅंकर
सांगलीच्या पाच तालुक्यांतील ७५ गावे ४९२ वाड्यांमधील सुमारे दीड लाखाहून अधिक लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ६६ टॅंकर धावत आहेत. जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यात पाणीटंचाई चांगलीच वाढली असून, आटपाडीमधील २२ गावे १६५ गावे व जतमधील ३४ गावे २६७ गावांत टॅंकर सुरू आहेत. खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात टंचाई भासू लागली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात टंचाई वाढली
पुणे, सातारा, सांगलीपाठोपाठ यंदा सोलापूर जिल्ह्यातही टंचाई वाढू लागली आहे. ९ तालुक्यांमध्ये टंचाई भासू लागली आहे.

टंचाईग्रस्त भागात सुरू असलेल्या टॅंकरची तालुकानिहाय संख्या 
पुणे - शिरूर १७, बारामती १६, दौंड ७, आंबेगाव ५, पुरंदर ३, जुन्नर ३, खेड ३, इंदापूर १.
सातारा - माण ४२, खटाव ६, कारेगाव ५, फलटण २. 
सांगली - जत २६, आटपाडी १७, कवठेमहांकाळ ६, खानापूर ५, तासगाव १.
सोलापूर - सांगोला ७, माढा ४, करमाळा ४, मोहोळ ३, अक्कलकोट २, 
दक्षिण सोलापूर १, मंगळवेढा १, माळशिरस १, उत्तर सोलापूर १.
 

इतर बातम्या
उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारची मदत...अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत...
फांगदर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त...नाशिक : देवळा तालुक्यातील फांगदर येथील...
यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही...यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या...
बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला...नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी...
परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१...परभणी : जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने...
हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदीनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची...बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या...बीड : आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती आणि...
पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला...पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात होणार २३५४ पीककापणी...पुणे   ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा...
पुणे जिल्ह्यात लसीकरण पडताळणीसाठी...पुणे  : महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त...
नगर जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर ज्वारी...नगर : कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; खरीप...सातारा  ः पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील...
रविकांत तुपकर यांचा पुन्हा `स्वाभिमानी`...कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत...