इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी धडपड

इंदापूर तालुक्‍यातील उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ज्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांनाच पाण्यासाठी झगडावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा उभा करणार आहे. - प्रवीण माने, बांधकाम व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद
शेतकऱ्यांची पाण्य़ासाठी धडपड
शेतकऱ्यांची पाण्य़ासाठी धडपड

वालचंदनगर, जि. पुणे   ः राज्यातील सर्वांत जास्त पाणी साठवण क्षमतेच्या धरणामध्ये इंदापूर तालुक्‍यातील उजनी धरणाचा समावेश होतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन नसल्यामुळे साठा झपाट्याने कमी होत आहे. इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना धरणातील थेंब थेंब पाण्यासाठी झगडावे लागत आहे.

इंदापूर तालुक्‍याच्या एका बाजूने नीरा नदी वाहत आहे. तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी वाहत आहे. भीमा नदीवरती उजनी धरणाची निर्मिती सुमारे ३९ वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. इंदापूर, दौंड व करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी काळ्याभोर जमिनी धरणासाठी कवडीमोल दराने दिल्या. ११७ टीएमसी पाणीसाठा असलेल्या धरणामध्ये पावसाळ्यामध्ये १२३ टीएमसीपर्यंत पाणी साठवता येते. इंदापूर, बारामती, दौंड तालुक्‍यांमध्ये पावसाचा एक थेंब जरी पडला नाही तरीही उजनी धरण शंभर टक्के भरत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन नसल्यामुळे साठा झपाट्याने कमी होत चालला आहे.

उजनी धरणातील मार्च-एप्रिल महिन्यापासून पाणी मायनसमध्ये जात आहे. आज धरणातील पाणीसाठा उणे ५५ टक्के झाला आहे. यामुळे इंदापूर, दौंड तालुक्‍यांतील पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उजनीचे पाणी मिळविण्यासाठी दररोज गाळामध्ये जाऊन पाण्यासाठी विद्युत पंपाची दुरुस्ती करावी लागत आहे. पाण्याची पातळी जसजशी कमी होईल तसतसे विद्युत पंपाच्या पाइप वाढवावे लागत आहेत. तसेच जेसीबी, पोकलेन मशिनने पाण्यापर्यंत चारी खोदावी लागत आहे. धरण उशाला व कोरड घशाला, अशी इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. आगामी काळामध्ये या प्रश्‍नावरती मार्ग काढण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडताना जिल्हाधिकारी, इंदापूर व दौंड तालुक्‍यांतील लोकप्रतिनिधी, प्रशासनाशी चर्चा करून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com