agriculture news in marathi, water shortage in region, pune, maharashtra | Agrowon

पाणीटंचाईमुळे पुणे जिल्ह्यातील ३६ तालुक्यांची होरपळ
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 एप्रिल 2019

पुणे   : उन्हाच्या झळा वाढत असल्याने विभागातील सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील ४५ पैकी ३६ तालुके पाणीटंचाईने होरपळत आहेत. ५८० गावे ३८०४ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत असून, टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठ्यासाठी ६८० टॅंकर सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अद्यापही टॅंकर सुरू करावा लागलेला नाही, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

पुणे   : उन्हाच्या झळा वाढत असल्याने विभागातील सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील ४५ पैकी ३६ तालुके पाणीटंचाईने होरपळत आहेत. ५८० गावे ३८०४ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत असून, टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठ्यासाठी ६८० टॅंकर सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अद्यापही टॅंकर सुरू करावा लागलेला नाही, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

पुणे विभागातील तब्बल १२ लाख ६१ हजारांहून अधिक लोकसंख्येला, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील १ लाख ६४ हजारांहून अधिक जनावरांना टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून, सुमारे ३ लाख ५८ हजार, सांगलीतील सुमारे ३ लाख ५७ हजार, सातारा जिल्ह्यातील सुमारे २ लाख ९७ हजार, पुणे जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार लोकसंख्येला पिण्यासाठी टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. जत तालुक्यातील सर्वाधिक २ लाख १५ हजार, तर माण तालुक्यातील  १ लाख २७ हजार नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील १७८ गावे, १२०६ वाड्यांना १९४ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सांगली जिल्ह्यातही पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून, १६९ गावे १०७१ वाड्यांना १७६ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. साताऱ्यातील १५५ गावे ७०७ वाड्यांना १६९ टॅंकरने, तर पुणे जिल्ह्यातील ७८ गावे ८२० वाड्यांमध्ये १३१ टॅंकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

सांगलीतील जत तालुक्यातील सर्वाधिक ८६ गावे ६५० वाड्यांना १०१ टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे, तर माण, आटपाडी, सांगोला तालुक्यात मध्येही पाणीटंचाईच्या झळा वाढत आहेत. टंचाईत होरपळणाऱ्या गावांना पाणी पुरवठ्यासाठी ३०३ विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यातच पाण्याचा उपसा वाढल्याने भूजल पातळी सातत्याने कमी होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल कोरडे पडल्याने टंचाई आणखी वाढणार आहे.  

 

विभागातील पाणीटंचाईची जिल्हानिहाय स्थिती
तालुके गावे वाड्या टॅंकर
पुणे ७८ ८२० १३१
सातारा  १५५ ७०७ १७९
सांगली १६९ १०७१ १७६
सोलापूर  १७८ १२०६ १९४
एकूण  ५८० ३८०४ ६८०

 

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
उत्तर भारतात अतिदक्षतेचा इशारा; नद्या...नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता उत्तर भारतही...