agriculture news in marathi, water showering wories farmer, weather forecast | Agrowon

विदर्भात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पुणे : कोकणात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. बुधवारी (ता.७) कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे नगर, नाशिक, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. परिणामी आंबा, हरभरा व वेलवर्गीय पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून काढणी केलेल्या पिकांची झाकण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन केले आहे.

पुणे : कोकणात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. बुधवारी (ता.७) कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे नगर, नाशिक, मराठवाड्यातील बीड, औरंगाबाद आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. परिणामी आंबा, हरभरा व वेलवर्गीय पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून काढणी केलेल्या पिकांची झाकण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठाच्या परिसरात १४.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली.

कोकणात घाटमाथ्यावर पाऊस ः
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबई परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. त्यामुळे या भागातून थंडी परतली आहे. बुधवारी (ता.७) सकाळी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाच्या अधूनमधून सरी बरी पडल्या. तर दिवसभर ढगाळ हवामान होते. त्याचा आंब्याच्या बहरावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात पावसाचा शिडकावा ः
कोकण, मध्य महाराष्ट्रात मंगळवारी (ता. ६) दिवसभर ढगाळ हवामान होते. रात्री बारा नंतर अचानक काही प्रमाणात ढग जमा झाले होते. रात्री पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काही भागात पावसाचा शिडकावा झाला. सकाळी पुणे शहरातील बिबवेवाडी, कात्रज येथे पावसाचे काही प्रमाणात शिडकावा झाला. नाशिक जिल्ह्यात सटाणा, साताऱ्यातील वाई, कोयना, पाटण, कोल्हापुरातील कागल, सांगलीतील मिरज, तासगाव सोलापुरातील अकलूज अशा काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. उर्वरित भागात ढगाळ होते. त्यामुळे हरभरा पिकांवर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात ढगाळ हवामान ः
मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली असून थंडी पळाली आहे. मात्र, बुधवारी सकाळी बीड जिल्ह्यातील बर्दापूर, अंबाजोगाई, जालना, परभणीतील अधूनमधून पावसाचे थेंब पडले. औरंगाबादमधील गारखेडा येथे पावसाचा शिडकावा पडला. उर्वरित भागात दिवसभर हवामान ढगाळ होते.

विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस :
विदर्भातील अनेक भागात हवामान ढगाळ होते. मात्र, बुधवारी सकाळी यवतमाळ जिल्हातील मारवाडी बु आणि पिंपळगाव येथे हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्या. तर अकोला, वाशीम, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान होते. येत्या सोमवारपर्यंत विदर्भात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या पिकांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

बुधवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) २१.५ (४), अलिबाग २२.० (५), रत्नागिरी २१.२ (१), भिरा २०.० (५), डहाणू २१.६ (४), पुणे १७.१ (६), नगर १६.५ (३), जळगाव १४.४(२), कोल्हापूर १९.६ (४), महाबळेश्वर १५.६ (२), मालेगाव १६.५ (५), नाशिक १५.८ (५), निफाड १४.८, सांगली १८.७ (४), सातारा १८.२ (५), सोलापूर १९.५ (२), औरंगाबाद १६.६ (५), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) १४.०, परभणी शहर १५.४, नांदेड १७.५ (३), उस्मानाबाद १४.४, अकोला १९.५ (४), अमरावती २०.२ (४), बुलढाणा १९.८ (४), चंद्रपूर १६.२, गोंदिया १५.२, नागपूर १५.८ (१), वर्धा १८.२ (४), यवतमाळ १६.०

विदर्भात गारांचा पाऊस पडण्याची शक्यता ः
गेल्या चार ते पाच दिवसांपासून कर्नाटक, अरबी समुद्र ते मालदीव या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला असून
बहुतांशी भागात ढगाळ हवामान होते. येत्या सोमवारपर्यंत (ता.१२) पर्यंत राज्यात ढगाळ हवामान राहणार असून रविवारी (ता.११) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही
भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...