agriculture news in marathi, water situation is critical in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात टंचाई स्थिती गंभीर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

नाशिक ः जिल्ह्यात गेल्या वर्षी ११३ टक्के पडलेला पाऊस व सलग चार वर्षे जलयुक्त शिवार योजनेत शेकडो गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सुमारे ४२७ गावे, वाड्यांना ९५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक ः जिल्ह्यात गेल्या वर्षी ११३ टक्के पडलेला पाऊस व सलग चार वर्षे जलयुक्त शिवार योजनेत शेकडो गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सुमारे ४२७ गावे, वाड्यांना ९५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

माॅन्सूनचे आगमन अद्याप जिल्ह्यात झालेले नसल्याने पाऊस लांबणीवर पडल्यास टॅँकर शंभरी पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी मे अखेर जिल्ह्यात ७८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करून टंचाईग्रस्त गावांची तृष्णा भागविण्यात आली होती, तथापि, पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात ११३ टक्के पाऊस पडून नदी, नाले दुथडी भरून वाहिले व धरणांमध्येही शंभर टक्के पाणी साठवणूक झाली असताना यंदा जानेवारी महिन्यापासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला.

सिन्नर, नांदगाव, बागलाण तालुक्यांनी टॅँकरचे प्रस्ताव पाठवूनही प्रशासनाने या प्रस्तावांमध्ये तांत्रिक दोष काढून ते परत पाठविले व ज्या गावांना पाणीटंचाई निर्माण झाली त्या गावाच्या लगत तीन किलोमीटर अंतरावर पाण्याचे स्रोत शोधण्याचा जालीम उपाय सुचविण्यात आला होता. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र जलयुक्त शिवार योजनेच्या कामांच्या उद्‍घाटनाचा सपाटाही लावण्यात आला, तर गेल्या चार वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेत केलेल्या कामांनी भूपृष्ठातील जलपातळी वाढल्याचे दावेही करण्यात आले.

प्रत्यक्षात जून महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून, १२८ गावे व २९९ वाड्यांसाठी ९५ टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अद्याप माॅन्सूनचे आगमन झालेले नाही, मात्र ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत दमदार पाऊस झाल्याशिवाय ते शक्य नाही.

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...