agriculture news in marathi, Water is speedly rise in Ujani dam | Agrowon

उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 जुलै 2018
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत अाहे. शुक्रवारी (ता.२०) दुपारी ही पाणीपातळी १६.०९ टक्‍क्‍यांच्या पुढे गेली आहे. सध्या पाण्याचा विसर्ग बंद आहे, पण पूर्वीचे पाणी अद्यापही धरणात येत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात भर पडत आहे.
 
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत अाहे. शुक्रवारी (ता.२०) दुपारी ही पाणीपातळी १६.०९ टक्‍क्‍यांच्या पुढे गेली आहे. सध्या पाण्याचा विसर्ग बंद आहे, पण पूर्वीचे पाणी अद्यापही धरणात येत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात भर पडत आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने चढ-उतार झाला. पण अलीकडच्या दोन-तीन दिवसांत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने उणेमध्ये गेलेले धरण अवघ्या दोनच दिवसांत प्लसमध्ये आले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह कमी असला, तरी पूर्वीचे पाणी उजनी धरण्यात येऊन मिसळत असल्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढत चालली आहे. दौंड येथून शुक्रवारी १६ हजार १९७ क्‍युसेकने पाणी येत होते. तर बंडगार्डन येथील विसर्ग बंद राहिला. पण पुढील एक-दोन दिवसांमध्ये धरणाच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.
 
पुणे जिल्ह्यातील पाऊसही आता थांबला आहे, तो पुन्हा सुरू झाल्यास पाणी आणखी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास धरणाची एकूण पाणीपातळी  ४९२.२०० मीटर इतकी होती. तर एकूण पाणीसाठा २०१६.९१ दशलक्षघनमीटर (७२.२८ टीएमसी) आहे. तर त्यापैकी उपयुक्त साठा २४४.१० दशलक्षघनमीटर (८.६२ टीएमसी) इतका आणि पाण्याची टक्केवारी १६.०९ टक्के इतकी होती.

इतर ताज्या घडामोडी
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...