मराठवाड्यातील प्रकल्पांची पाणीस्थिती बिकट

मराठवाड्यातील प्रकल्पांची पाणीस्थिती बिकट
मराठवाड्यातील प्रकल्पांची पाणीस्थिती बिकट

औरंगाबाद : पुरेशा पावसाअभावी मराठवाड्यातील प्रकल्पांची अवस्था दयनीय झाली आहे. मराठवाड्यातील ८७२ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये क्षमतेच्या तुलनेत केवळ ०.८० टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास मराठवाड्यात पाण्याचा प्रश्‍न आणखी भीषण होण्याची शक्‍यता आहे.  

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत केवळ ०.३५ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पांत २.६८ टक्‍के, ७४९ लघू प्रकल्पांत १.३० टक्‍के, तर गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांत ०.०३ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा थेंब नाही. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी २८ प्रकल्प कोरडेठाक आहेत. ३८ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

कोरड्या पडलेल्या मध्यम प्रकल्पात औरंगाबाद जिल्ह्यातील ८, जालना १, बीड ८, लातूर १, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. ७४९ लघू प्रकल्पांपैकी ३५८ प्रकल्प कोरडेठाक पडले असून ३२५ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. 

लातूर जिल्ह्यातील ८, उस्मानाबाद जिल्ह्यातील १७, परभणी जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी १६ मध्यम प्रकल्पांमध्ये प्रत्येकी २ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. नांदेड जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पांत ३ टक्‍के, तर जालना जिलह्यातील ७ मध्यम प्रकल्पांत २१ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला आहे. 

बीड, उस्मानाबाद, हिंगोलीत एक टक्काच उपयुक्त पाणी

बीड जिल्ह्यातील १२६, उस्मानाबाद जिल्ह्यातील २०५, हिंगोलीतील २६ लघू प्रकल्पांत केवळ एक टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. जालना जिल्ह्यातील ५७, लातूरमधील १३२, परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याची स्थिती आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी उर्ध्व पैनगंगा व निम्न मनार वगळता एकाही प्रकल्पात उपयुक्‍त पाणी नसल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com