धरणांतील पाणीसाठा वाढू लागला

धरणांतील पाणीसाठा वाढू लागला
धरणांतील पाणीसाठा वाढू लागला

पुणे ः गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. पडलेल्या पावसामुळे ओढे, नाले वाहू लागले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यातील २३ धरणांत एकूण ३७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला झाला आहे.  

पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात एकूण २३ धरणे आहेत. यात लहान मोठ्या धरणांचा समावेश असून, या धरणातील पाणीसाठ्यात उन्हाळ्यात चांगलीच घट झाली होती. जवळपास सहा ते सात धरणे कोरडी पडली होती. उर्वरित काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला होता. एक जूनपासून पुणे जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. दहा ते वीस जून या कालावधीत पावसाचा खंड पडला असला, तरी नंतरच्या कालावधीत या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

यंदा मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक जूनपासून आत्तापर्यंत ७७२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६९७, वडीवळे ४९३, पवना ४९१, वरसगाव ४६१, पानशेत ४५५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. उर्वरित धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बऱ्यापैकी ओढे, नाले वाहू लागले आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२८ मिलिमीटर, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११९, पवना १०३, वरसगाव ७२, पानशेत ७२, गुंजवणी ६०, वडीवळे ५६, नीरा देवघर ४४, कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com