उजनी, कोयना, जायकवाडी धरणांत पाणीसाठा वाढला

गोदावरी नदी
गोदावरी नदी

पुणे ः सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसतानाही गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उजनी धरणातील पाणीपातळी वाढून प्लसमध्ये येत १.१३ टक्के पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात ऊर्ध्व भागातील प्रकल्पांमधून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने प्रकल्पात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जायकवाडीतील एकूण पाणीसाठा २२.०८ टीएमसीवर पोचला होता. जायकवाडीत २२ टीएमसी पाणीसाठा  मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या जायकवाडी प्रकल्पात ऊर्ध्व भागातील प्रकल्पांमधून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरूच आहे. या विसर्गामुळे जायकवाडी प्रकल्पात मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जायकवाडीतील एकूण पाणीसाठा २२.०८ टीएमसीवर पोचला होता. गत चोवीस तासांत प्रकल्पात जवळपास १.८२ टीएमसी पाणी आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. दारणा प्रकल्पातून १३ हजार ५८ क्‍युसेक, गंगापूरमधून ७८३३ क्‍युसेक, पालखेडमधून ६०७ क्‍युसेक, कडवा प्रकल्पातून २७१८ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. नागमठाणमधून ३२ हजार ३०७ क्‍युसेकने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग नदीपात्रातील पाण्याचा पातळीत वाढ करून गेला. प्रकल्पात सुरू असलेली पाण्याची आवक २५ हजार ५७१ क्‍युसेकवर पोचली. अजूनही मृत साठ्यात असलेल्या जायकवाडी प्रकल्पाच्या दिशेने ऊर्ध्व भागातील पाण्याचा विसर्ग असाच सुरू राहिल्यास जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने वाढत राहील, अशी आशा आहे.  अखेर उजनी ‘प्लस’मध्ये  सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणातील पाण्यावर धरणाची उणे पातळी मंगळवारी (ता. ३०) सकाळी अखेरीस ‘प्लस’मध्ये आली. गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात पावसाने चांगलीच मजल मारली आहे. त्यामुळे पुण्यातील सर्वच्या सर्व १८ धरणे आता ओव्हरफ्लोच्या स्थितीत आहेत. त्यामुळे या धरणातून अतिरिक्त पाणी उजनी धरणाकडे सोडले जात आहे. मंगळवारी दौंडकडून ४४ हजार ४६२ क्‍युसेक आणि बंडगार्डनकडून २६ हजार ८२४ क्‍युसेक असा ७१ हजार २८६ क्‍युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता. आतापर्यंत धरणामध्ये जवळपास ६१ टक्के इतके पाणी आले आहे. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास धरणातील एकूण पाणीपातळी ४९१.४० मीटर इतकी होती. तर पाणीसाठा १८०४.८० दलघमी (६३.७३ टीएमसी) एवढा होता. त्यापैकी उपयुक्त साठा ०.०७ टीएमसी एवढा तर पाण्याची टक्केवारी १.१३ टक्के एवढी होती. त्यामुळे जिल्ह्यात पाऊस नसतानाही पुण्याच्या पाण्यावर मात्र धरणाची पातळी वाढली. परिणामी, आता निम्म्या जिल्ह्याला त्यामुळे दिलासा मिळाला आहे.  कोयना ६७.७७ टक्के  भरले कोयना धरणक्षेत्रात सोमवारी पावसाचा जोर कायम राहिला आहे. यामुळे धरणात २४ तासात ५.६८ टीएमसी वाढ झाली आहे. सध्या धरणात प्रतिसेंकदास ६२,१९७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मंगळवारी सकाळी आठ पर्यत कोयना धरणाची  पाणीपातळी २१३१.०५ फूट झाली असून ७१.३३७ टीएमसी म्हणजेच ६७.७७ टक्के  एवढा  पाणीसाठा झाला आहे. इतर प्रमुख धरणात पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढाला असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com