agriculture news in marathi, Water stolen storage tank locked lock | Agrowon

पाणी चोरीच्या भीतीने साठवण तलाव कुलूपबंद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

वर्धा : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पाण्याची चोरी होण्याच्या शक्‍यतेने कारंजा तालुक्‍याअंतर्गत येणाऱ्या ठाणेगावातील शेतकरी व ग्रामपंचायतीने थेट तलावाचे पाणी कालव्यात सोडण्यासाठी असलेल्या रेग्युलेटर व्हॉललाच कुलूप ठोकले आहे. हा तलाव ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आला असून, पाणीवाटपाचे नियोजन आता मागणीनुसार होणार आहे.

वर्धा : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पाण्याची चोरी होण्याच्या शक्‍यतेने कारंजा तालुक्‍याअंतर्गत येणाऱ्या ठाणेगावातील शेतकरी व ग्रामपंचायतीने थेट तलावाचे पाणी कालव्यात सोडण्यासाठी असलेल्या रेग्युलेटर व्हॉललाच कुलूप ठोकले आहे. हा तलाव ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आला असून, पाणीवाटपाचे नियोजन आता मागणीनुसार होणार आहे.

कारंजा तालुका दुष्काळाच्या यादीत आहे. भविष्यातील परिस्थितीमुळे पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. पाणी चोरी, अपव्यय टाळण्यासाठी नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव येथील तलावाचे पाणी कुलूपबंद करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागाच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत आणि शेतकऱ्यांनी ही युक्‍ती लढवली. सुमारे ४० वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागाने या साठवण तलावाची निर्मिती केली. एवढ्या वर्षात तलावचे कालवे अनेक ठिकाणी बुजले, नादुरुस्त झाले. या तलावाची जलयुक्‍त शिवार योजनेतून दुरुस्ती करण्यात आली. चार किलोमीटर कालव्याचे खोलीकरण करण्यात आले. तलावाचे देखील खोदकाम करून गाळ काढण्यात आला.

या तलावाची ५८२ सहस्त्र घनमीटर इतकी पाणी साठवण क्षमता आहे. आज त्यात अंदाजे ५५० सहस्त्र घनमीटर म्हणजे ९० टक्‍के पाणी शिल्लक आहे. जे यंदा रब्‍बी पिकासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. जलयुक्‍त शिवारच्या कामामुळे तलावातून १०० हेक्‍टरची सिंचन क्षमता पुनर्स्थापित झाली आहे. इतर लघू सिचंन प्रकल्पांतील पाण्याचाही काटकसरीने वापर करावा, अशी माहिती लघू सिंचन विभागाच्या उपअभियंत्यांनी दिली.

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...