agriculture news in Marathi water storage at 41 percent Maharashtra | Agrowon

देशातील धरणांमध्ये जलाशयांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा 

कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

 देशातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. देशातील महत्त्वाच्या १२३ जलाशयांमध्ये गुरुवारपर्यंत (ता. ३०) ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. या जलाशयांमध्ये एकूण ६९.९८२ अब्ज घन मीटर उपयुक्त पाणी शिल्लक आहे. 

नवी दिल्ली: देशातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. देशातील महत्त्वाच्या १२३ जलाशयांमध्ये गुरुवारपर्यंत (ता. ३०) ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. या जलाशयांमध्ये एकूण ६९.९८२ अब्ज घन मीटर उपयुक्त पाणी शिल्लक आहे. हा साठा गेल्यावर्षी याच काळात असलेल्या साठ्याच्या तुलनेत ४१ टक्के अधिक आहे, तर दहा वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून मिळाली. 

देशात यंदा मॉन्सूनच्या सुरुवातीच्या काळापासूनच चांगला पाऊस पडत आहे. त्याचा परिणाम जलाशयांमधील साठ्यावर झाला आहे. गेल्या वर्षी या काळात देशातील अनेक भागांत पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ नव्हती. मात्र शेवटच्या टप्प्यात आणि परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आणि जलाशये तुडुंब भरली.

त्यातच मार्च महिन्यापासून कोरोनाच्या संकाटामुळे उद्योगधंदे ठप्प पडले आणि शेतीच्या कामांवरही परिणाम झाला. त्यामुळे उन्हाळी हंगामात लागणारे पाणी कमी झाले आणि जलाशयांमध्ये अधिक पाणी शिल्लक राहिले. या सर्वांचा परिणाम म्हणजे यंदा जलाशयांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. 

पूर्व विभागात सध्या ३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच काळात केवळ २० टक्के पाणीसाठा होता. तर पश्‍चिम विभागात सध्या ४२ टक्के पाणी असून गेल्यावर्षी २५ टक्के साठा होता. तर, मध्य विभागात सध्या ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्यावर्षी ३० टक्के पाणी होते. दक्षिण विभागात गेल्यावर्षी २६ टक्के पाणीसाठा होता तर यंदा ३८ टक्के पाणी शिल्लक आहे. तर उत्तर विभागात यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी या विभागात ५१ टक्के पाणी शिल्लक होते, तर यंदा ४४ टक्के पाणीसाठा जलाशयांमध्ये शिल्लक आहे. 

उत्तर विभागात ४४ टक्के साठा 
देशाच्या उत्तर विभागात हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. या विभागातील महत्त्वाच्या आठ जलाशयाची उपयुक्त पाणीसाठा क्षमता १९.१७ अब्ज घन मीटर असून सध्या ८.४८ अब्ज घन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण क्षमतेच्या ४४ टक्के साठा आहे. गेल्यावर्षी याच काळात विभागात तब्बल ५१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर गेल्या दहा वर्षाची सरासरी ४७ टक्के आहे. 

पूर्व विभागात ३१ टक्के पाणी 
पूर्व विभागात झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा आणि नागालॅंडचा समावेश होतो. या विभागातील महत्त्वाच्या १८ जलाशयांची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९.४३ अब्ज घन मीटर आहे. सध्या येथील जलाशयांमध्ये ३१ टक्के साठा असून ६.०८ अब्ज घन मीटर उपयुक्त पाणी आहे. गेल्यार्षी याच काळात विभागात २० टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. तर मागील दहा वर्षातील सरासरी ३२ टक्के होती. 

पश्‍चिम विभागात ४२ टक्के जलसाठा 
पश्‍चिम विभागात गुजरात आणि महाराष्ट्र राज्याचा समावेश होतो. विभागातील महत्वाच्या ४२ जलाशयांची उपयुक्त साठा क्षमता ३५.२४ अब्ज घन मीटर असून सध्या या जलाशयांमध्ये १४.८१ अब्ज घन मीटर साठा आहे. उपयुक्त साठ्याच्या ४२ टक्के पाणी शिल्लक असून गेल्यावर्षी याच काळात विभागात केवळ २५ टक्के उपयुक्त साठा शिल्लक होता. गेल्या १० वर्षाची सरासरी ३८ टक्के आहे. 

मध्य विभागात ४७ टक्के साठा 
मध्य विभागात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि 
छत्तीसगडचा समावेश होतो. विभागातील महत्वाच्या १९ जलाशयांची उपयुक्त पाणीसाठा क्षमता ४४.४५ अब्ज घन मीटर असून त्यापैकी सध्या ४७ टक्के पाणी शिल्लक आहे. जलाशयांमध्ये सध्या २०.७५ अब्ज घन मीटर साठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच काळात ३० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर गेल्या दहा वर्षाची शिल्लक पाणीसाठ्याची सरासरी ४१ टक्के आहे. 

दक्षिण विभागात ३८ टक्के जलसाठा 
दक्षिण विभागात आंध्र प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश होतो. विभागातील ३६ महत्वाच्या जलाशयांची उपयुक्त साठा क्षमता५२.८१ अब्ज घन मीटर असून सध्या १९.८८ अब्ज घन मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. उपयुक्त जलसाठ्याच्या ३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी २६ टक्के पाणी शिल्लक होते तर, मागील दहा वर्षातील सरासरी ४० टक्के आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...
आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारांसोबत...मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार राज्य...
कीडनाशकांवर बंदीबाबत अभ्यासच झालेला नाहीपुणे: कृषी रसायन क्षेत्रात काही कीडनाशकांवर...
जालन्यात रेशीम कोषांची उलाढाल ६६...जालना: येथील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेची यंदाच्या...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
दूध आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणारनगर ः दुधाला प्रतिलिटर तीस रुपये दर मिळावा आणि...
पॉवर टीलर आयातीवर निर्बंधपुणे: भारत-चीन वादाचा फटका आता पॉवर टीलर...
नगर जिल्ह्यात तेलकट डागांमुळे डाळिंब...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा छोटी तसेच तोडणीला...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरीपुणे ः  कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश,...
लक्ष वळविण्याची राजकीय खेळी!एखाद्या महासंकटाचा राजकीय लाभ कसा उठवायचा हे...
जो पारदर्शी तोच टिकेलकेंद्र सरकारने ‘एक देश एक बाजार’ योजनेची घोषणा...
आदिवासी महामंडळातर्फे ४९ लाख क्विंटल...नाशिक : कोरोनाच्या संकट काळात आदिवासी विकास...
संशोधनासाठी मोसंबी वाणांचे जतन फायदेशीर...बदनापूर, जि. जालना : मोसंबी फळपिकांच्या विविध...
परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल...परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी...