सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ५० टक्क्यांवर पाणीसाठा

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ५० टक्क्यांवर पाणीसाठा
सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ५० टक्क्यांवर पाणीसाठा

सातारा ः जिल्ह्यातील प्रमुख धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने धोम धरणाचा अपवाद वगळता सर्वच धरणांत ५० टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे. वीजनिर्मितीच्या महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात ६५ टीएमसी म्हणजेच ६२.३७ टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी व धोम-बलकवडी या धरणांची क्षमता मोठी असल्याने ही प्रमुख धरणे आहे. जून तसेच जुलै महिन्याच्या सुरवातीस पाऊस कमी झाल्याने धरणे भरणार की नाही, याबाबत तर्कविर्तक केले जात होते. मात्र, मागील आठ ते दहा दिवसांत कमी अधिक पाऊस झाल्याने धरणे भरण्याची आशा निर्माण झाली आहे. सध्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. 

वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणात दमदार पाऊस सुरू आहे. धरणक्षेत्रातील कोयना १४४, नवजा २०३, महाबळेश्वर २०३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात प्रतिसेकंद ३१,६९१ क्युसेक पाण्याची आवक होत असून, धरणात २४ तासांत ३.२४ टीएमसी वाढ झाली आहे. कोयना धरणाची सोमवारी सकाळी आठपर्यंत पाणीपातळी २१२५ फूट झाली असून, ६५.६५ टीएमसी म्हणजेच एकूण ६०.५४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

कोयना धरणात सध्या ६२.३७ टक्के पाणीसाठा झाला आहे. धोम धरणात ४०.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा अपवाद वगळता इतर सर्व धरणे ५० टक्क्यांवर भरली आहेत. दुष्काळी माण, खटाव व सातारा तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या उरमोडी धरणात ५१.४५ टक्के भरले असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कण्हेर, धोम-बलकवडी, तारळी, वीर या प्रमुख धरणांत ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास ही धरणे लवकरच भरतील.  

जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीपातळी टीएमसीमध्ये व कंसात टक्केवारी ः कोयना- ६०.५४ (६०.४८), धोम- ४.७८ (४०.८६), धोम-बलकवडी- ३ (७५.६७), कण्हेर- ७ (७२.९८), उरमोडी-४.९७ (५१.४५), तारळी-४.६९(८०.२६), निरा-देवघर - ७.३३ (६२.४९), भाटघर- १४.८७ (६३.२९), वीर- ८.५१ (९०.५०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com