Agriculture news in Marathi, water storage 99% in major dams in Satara | Agrowon

साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍यांवर पाणीसाठा 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका पिकांना बसला असलातरी धरणांच्या दृष्टीने फायदेशीर झाला आहे. वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या कोयना धरणात एकूण १०४.२९; तर उपयुक्त ९९.७१ टीएमसी साठा झाला आहे. सध्या या धरणात ९९.०४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील तारळी धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व धरणांत ९९ टक्क्‍यांवर पाणीसाठा आहे. 

सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका पिकांना बसला असलातरी धरणांच्या दृष्टीने फायदेशीर झाला आहे. वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या कोयना धरणात एकूण १०४.२९; तर उपयुक्त ९९.७१ टीएमसी साठा झाला आहे. सध्या या धरणात ९९.०४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील तारळी धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व धरणांत ९९ टक्क्‍यांवर पाणीसाठा आहे. 

जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र, हाच पाऊस धरणाच्या दृष्टीने फायदेशीर झाला आहे. सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरून वाहिली आहेत. प्रत्येक धरणातून चार ते पाच वेळा पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम-बलकवडी या प्रमुख सहा धरणांतून १२५ टीएमसीपेक्षा अधिक पाणी विनावापर सोडावे लागले आहे. 

सध्या सर्वच प्रमुख धरणांत मुबलक पाणीसाठी झाल्याने टंचाईच्या काळात फायदेशीर होणार आहे. राज्याच्या वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या १०४.२९; तर उपयुक्त ९९.७१ टीएमसी साठा झाला आहे. सध्या या धरणात ९९.०४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यात पाणी क्षमतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धोम धरणात ११.६९ टीएमसी म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. कण्हेर, उरमोडी, तारळी धोम-बलकवडी या चार प्रमुख धरणांत ९९ टक्के; तर तारळी धरणात ८८.७२ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

प्रमुख धरणांत १३९.२३ टीएमसी पाणीसाठा
जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी व धोम-बलकवडी ही प्रमुख धरणे आहेत. यामध्ये कोयना धरणाची क्षमता राज्यात दोन नंबरची आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी व परती तसेच वादळी पावसामुळे पुढील दोन महिने तरी धरणातील पाण्याची गरज भासणार नाही. तसेच गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी धरणात जास्त पाणी उपलब्ध आहे. सध्या प्रमुख धरणातील १३९.२३ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. यामुळे या वर्षी टंचाईच्या काळात धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने टंचाई भासण्याची शक्यता कमी राहणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...