नाशिक जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा ८४ टक्क्यांवर

नाशिक : ऑगस्ट महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या स्वरूपाच्या २३ धरणांमधील पाणीसाठा ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Water storage of dams in Nashik district over 84 percent
Water storage of dams in Nashik district over 84 percent

नाशिक : ऑगस्ट महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या स्वरूपाच्या २३ धरणांमधील पाणीसाठा ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, मागील वर्षी या कालावधीत ९१ टक्के पाणीसाठा होता. याच तुलनेत चालू वर्षी धरण साठा ७ टक्के कमी आहे. मात्र, ऑगस्टच्या मध्यात झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे.  

जिल्ह्याच्या सरासरी कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्‍यांमध्ये चालू वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने या भागात पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. त्यामध्ये मालेगाव, सटाणा, कळवण, नांदगाव, निफाड, चांदवड, देवळा व येवला या तालुक्यात ऑगस्टअखेर पावसाचे समाधानकारक चित्र आहे. तर, त्या तुलनेत अधिक पर्जन्य छायेच्या प्रदेशात इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ व सुरगाणा या भागात सरासरीच्या तुलनेत पावसाचा जोर नसल्याचे चित्र आहे. मात्र संततधारेमुळे पश्चिम पट्ट्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. 

मागील वर्षी यादरम्यान ११ धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली होती. मात्र, सध्या त्या तुलनेत ७ धरणे पूर्ण भरली आहेत. पालखेड धरण समूहातील पालखेड धरणात मागील वर्षी अवघा ३५ टक्के पाणीसाठा होता. मात्र, चालू वर्षी तो ८७ टक्क्यांवर गेला आहे. तर, करंजवन व वाघाड धरण ही भरलेली होती. चालू वर्षी मात्र अद्याप ती भरलेली नाहीत. तिसगाव, ओझरखेड व पुणेगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा आहे. तर, दारणा व गिरणा धरण समूहामध्ये चालू वर्षीचा साठा समाधानकारक आहे. सर्वात मोठ्या असणाऱ्या गिरणा धरणात पाणीसाठा चांगला आहे.

सात धरणांतून विसर्ग सुरू

दारणा (१३५०), भावली (७३), वालदेवी (२४१), कडवा (२१२), हरणबारी (१७३), केळझर (७५), पुनंद(६४०), तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून २४२१ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com