गिरणा धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरूवात

भडगाव, जि. जळगाव : गिरणा धरणाच्या जलसाठ्यात यंदाच्या पावसाळ्यात ३४ टक्के वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी दोन धरणे ‘ओव्हर फ्लो’, तर तीन धरणांत ८० टक्क्यांवर साठा आहे.
 Water storage in Girna Dam begins to increase
Water storage in Girna Dam begins to increase

भडगाव, जि. जळगाव  : गिरणा धरणाच्या जलसाठ्यात यंदाच्या पावसाळ्यात ३४ टक्के वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी दोन धरणे ‘ओव्हर फ्लो’, तर तीन धरणांत ८० टक्क्यांवर साठा आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणात रविवारी (ता.२३) ६५ टक्के जलसाठा झाला. धरणातील साठा यंदा शंभरी गाठण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

निम्म्या जळगाव जिल्ह्याचा शेती व पाण्याचा प्रश्न सोडविणाऱ्या गिरणा धरणात गेल्या वर्षी २३ ऑगस्टला ७८ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा होता. गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा १४ टक्के अधिक साठा आहे.

गिरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाचपैकी दोन धरणे शंभर टक्के भरली. तर, तीन धरणांतही ८० टक्क्यांपेक्षा अधिक साठा आहे. त्यामुळे त्या धरणातून विसर्ग सुरू आहे. ठेंगाळा बंधाऱ्यातून तीन हजार ४४४ क्यूसेकने धरणात आवक सुरू असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे एस. आर. पाटील यांनी सांगितले.

गिरणा धरण दृष्टिक्षेपात

क्षमता  २१,५०० दशलक्ष घनफूट
मृतसाठा ३,००० दशलक्ष घनफूट
उपयुक्त जलसाठा १८,५०० दशलक्ष घनफूट
एकूण लाभक्षेत्र    ६९,००० हेक्टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com