‘उजनी’तील पाणीसाठा शंभर टक्क्यांकडे...

सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणामध्ये वरच्या धरणाकडून अखंडपणे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणातील पाणीसाठा आता शंभर टक्क्याकडे वाटचाल करत आहे.
Water storage going on to One hundred percent in Ujani
Water storage going on to One hundred percent in Ujani

सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणामध्ये वरच्या धरणाकडून अखंडपणे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणातील पाणी पातळीत संथगतीने, पण लक्षणीय वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठा आता शंभर टक्क्याकडे वाटचाल करत आहे. गुरुवारी (ता.२७) धरणातील पाणी पातळी ९०.२२ टक्क्यांपर्यंत पोचली. पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिला, तर धरण शंभर टक्केची पातळी ओलांडणार आहे.

सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस थांबला आहे. पण पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरु आहे. पंधरवड्यापूर्वी १३ हजार क्युसेक सोडण्यात येणारा विसर्ग गेल्या आठवड्यापासून कमी कमी होत आला आहे. पण, तो कायम आहे.

गुरुवारीही तो ५ हजार ४६९ क्युसेक इतका होता. गेल्यावर्षी या दिवशी धरणात १०६.४९ टक्के इतका साठा होता. पण, यंदा तो ९०.२२ टक्क्यांवर आहे. यंदा वेळेवर पाऊस सुरु होऊनही त्यात फारसा जोर नसल्याने धरणाने काहिशा उशीराने शंभरीकडे वाटचाल सुरु केली आहे. पाण्याचा विसर्ग कमीच, पण असचा कायम राहिला. तर, येत्या आठवड्यात धरण शंभर टक्के क्षमता पूर्ण करेल, असे सांगण्यात आले.

गुरुवारची धरणातील पातळी

एकूण पाणीपातळी ४९६.३० मीटर
एकूण पाणीसाठा १११.९९ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा ४८.३३ टीएमसी
पाण्याची टक्केवारी ९०.२२ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com