agriculture news in Marathi water storage increased in ketepurna, pentakali, Khadakpurna Maharashtra | Agrowon

काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 जुलै 2020

वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत आत्तापर्यंत असमतोल स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. मात्र, काही भागांत अधिक प्रमाणात पाऊस झाला.

अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत आत्तापर्यंत असमतोल स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. मात्र, काही भागांत अधिक प्रमाणात पाऊस झाला. प्रामुख्याने या विभागातील मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा या तीन प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात गेल्या १५ दिवसांत चांगली वाढ होत आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे.

या विभागात काटेपूर्णा, वान, खडकपूर्णा, नळगंगा, पेनटाकळी हे मोठे प्रकल्प आहेत. काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला व ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा प्रकल्प सध्या ४६ टक्के भरला आहे. गेल्या वर्षी हा प्रकल्प १०० टक्के भरला होता. मात्र, पिण्यासह सिंचनासाठी पाण्याचा वापर केल्याने जूनमध्ये या प्रकल्पात १.१४ टीएमसी साठा शिल्लक होता. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही.

मात्र काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने काटेपूर्णातील साठा वेगाने वाढला. आता या प्रकल्पात सुमारे १.४० टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातील साठ्यातही जूनच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकल्पात ०.५४ टीएमसी साठा होता. सध्या हा साठा १.०५ टीएमटी झाला आहे. यासोबतच पेनटाकळी प्रकल्पातील पाणी साठासुद्धा वाढला आहे.

१४ जूनला या प्रकल्पात ०.८६ टीएमसी साठा होता. ७ जुलैला हा साठा १.०५ टीएमसी म्हणजेच ४७.७९ टक्के इतका झाला आहे. वान या मोठ्या प्रकल्पातील पाणी साठा वाढलेला नाही. १४ जूनला या प्रकल्पात १.२४ टीएमसी साठा होता. सध्या तो १.१२ टीएमसी आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

प्रकल्पांतील साठा (टीएमसीत)

प्रकल्प   क्षमता साठा टक्केवारी
काटेपूर्णा   ३.०४ १.४०    ४६.०६ 
वान    २.८९   १.१२   ३८.९५ 
खडकपूर्णा  ३.२९      १.०५  ३२.०१
नळगंगा  २.४४  १.२३   ५०.५१
पेनटाकळी  २.११   १.०५  ४७.७९

 


इतर अॅग्रो विशेष
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...
शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडलेपुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे...
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत...यावल, जि. जळगाव: केंद्राने ‘एक देश एक बाजार समिती...
‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके...पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (...
केळी पिकात तयार केली ओळखमोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव,जि.सांगली) येथील...
बंदीची प्रक्रिया हवी  सुटसुटीत अन्...केंद्र सरकारने १८ मे रोजी २७ कीडनाशकांच्या बंदीचा...
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
संपूर्ण नियमनमुक्तीची अंमलबजावणी करापुणे:  सर्वच शेतमालाच्या संपूर्ण...
बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणीपुणे: शेतमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती...नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून...
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु...मुंबई: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत...
बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित ...अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या...
'नाबार्ड’चा व्यवस्थापक नसल्यास अग्रणी...पुणे: कृषी पायाभूत निधी योजनेला प्रत्येक...
देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका...पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील...