कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठा

१०० दिवसांत चार ठिकाणी सर्वाधिक पडलेल्या मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्याची ओळख चेरापुंजी बनली आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०१.२४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठा
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठा

कोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या पावसाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. १०३ दिवसांत महाबळेश्वरला मागे टाकत नवजा व वलवण या पाणलोट क्षेत्रात शंभर टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जोर व पाटण तालुक्यातील कोयना पाणलोट क्षेत्रातील वलवण व नवजा या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. १०० दिवसांत चार ठिकाणी सर्वाधिक पडलेल्या मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्याची ओळख चेरापुंजी बनली आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०१.२४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.  मुसळधार पावसाचे माहेरघर म्हणून महाबळेश्वर ओळखले जात होते. महाबळेश्वरला मागे सारत नवजा या ठिकाणी सर्वाधिक पाऊस झाला असून, हे ठिकाण थंड हवेचे नवे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. या ठिकाणी जून ते ऑक्टोबर या चार महिन्यांतील एक जून ते नऊ सप्टेंबर या १०३ दिवसांत नवजात पाच हजार १५८ मिलिमीटर, वलवणला पाच हजार ९१४, तर महाबळेश्वरला पाच हजार १५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाई तालुक्यातील जोर येथे सहा हजार ५२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून आतापर्यंत ३५.५६ टीएमसी विनावापर, तर सात टीएमसी पायथा वीजगृहातून असे ४२.५६ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणात सध्या १०१.२४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com