agriculture news in marathi Water storage at Koyna Dam at one hundred one TMC | Page 2 ||| Agrowon

कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 सप्टेंबर 2021

१०० दिवसांत चार ठिकाणी सर्वाधिक पडलेल्या मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्याची ओळख चेरापुंजी बनली आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०१.२४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

कोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या पावसाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. १०३ दिवसांत महाबळेश्वरला मागे टाकत नवजा व वलवण या पाणलोट क्षेत्रात शंभर टक्के पाऊस झाला. जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जोर व पाटण तालुक्यातील कोयना पाणलोट क्षेत्रातील वलवण व नवजा या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. १०० दिवसांत चार ठिकाणी सर्वाधिक पडलेल्या मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्याची ओळख चेरापुंजी बनली आहे. १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०१.२४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

मुसळधार पावसाचे माहेरघर म्हणून महाबळेश्वर ओळखले जात होते. महाबळेश्वरला मागे सारत नवजा या ठिकाणी सर्वाधिक पाऊस झाला असून, हे ठिकाण थंड हवेचे नवे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. या ठिकाणी जून ते ऑक्टोबर या चार महिन्यांतील एक जून ते नऊ सप्टेंबर या १०३ दिवसांत नवजात पाच हजार १५८ मिलिमीटर, वलवणला पाच हजार ९१४, तर महाबळेश्वरला पाच हजार १५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाई तालुक्यातील जोर येथे सहा हजार ५२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून आतापर्यंत ३५.५६ टीएमसी विनावापर, तर सात टीएमसी पायथा वीजगृहातून असे ४२.५६ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणात सध्या १०१.२४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...