भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्के पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात यंदा दमदार पाऊस कोसळला. उजनीसह सर्वच धरणे ओसंडून वाहिल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागला.धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदी आणि उपनद्यांना अभूतपूर्व पूर आले. शुक्रवारी (ता. ४) उजनीसह सर्व धरणांमध्ये मिळून २१२.५७ टीएमसी (९८ टक्के) पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.   

उजनीसह पुणे जिल्ह्यातील सर्व २५ धरणांची चल (उपयुक्त) पाणीसाठा क्षमता २१६.८४ टीएमसी आहे. गतवर्षी (२०१८) शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलेली ओढ, यंदाच्या उन्हाळ्यात वाढलेल्या झळा यामुळे धरणांतील पाणीसाठा खूपच खालावला. उजनीसह अनेक धरणे अचल पातळीत गेली होती. मात्र पावसाच्या दमदार हजेरीने यंदा जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला.

पुणे शहर, हवेली, दौंड, इंदापूरला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात शुक्रवारी सकाळपर्यंत २८.५९ टीएमसी (९८ टक्के) पाणीसाठा आहे. उजनीसह जिल्ह्यातील १५ धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा असून, विसापूर वगळात सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणी आहे. 

शुक्रवारी (ता. ४) जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी : टेमघर ९.४६ (९३), वरसगाव १२.८२ (१००), पानशेत १०.६५ (१००), खडकवासला १.६६ (८४), पवना ८.५१ (१००), कासारसाई ०.५६ (९९), मुळशी १८.४६ (१००), कळमोडी १.५१ (१००), चासकमान ७.५७ (१००), भामा आसखेड ७.६७ (१००), आंद्रा २.९२ (१००), वडीवळे १.०७ (१००), गुंजवणी ३.५९ (९७), भाटघर २३.५० (१००), नीरा देवघर ११.७३ (१००), वीर ९.३४ (९९), नाझरे ०.५९ (१००), पिंपळगाव जोगे ३.६७ (९४), माणिकडोह ८.७४ (८६), येडगाव १.६५ (८५), वडज १.१७ (१००), डिंभे १२.४९ (१००), घोड ५.४७ (१००), विसापूर ०.२० (२२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com