agriculture news in marathi, water storage status, parbhani, maharashtra | Agrowon

`येलदरी`त ११.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

परभणी : परभणी-हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीवरील येलदरी धरणात रविवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत ११.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता; परंतु सिद्धेश्वर आणि निम्नदुधना प्रकल्पांमध्ये अद्यापही उणे पाणीसाठा आहे.

परभणी : परभणी-हिंगोली जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या पूर्णा नदीवरील येलदरी धरणात रविवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत ११.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता; परंतु सिद्धेश्वर आणि निम्नदुधना प्रकल्पांमध्ये अद्यापही उणे पाणीसाठा आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे येलदरी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली. रविवारी (ता.१३) सकाळी या धरणामध्ये ११.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. गतवर्षी (२०१८) याच तारखेला येलदरीमध्ये ९.३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. पाण्याची आवक सुरू असल्यामुळे उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये आणखी वाढ होणार आहे. येलदरी धरणाच्या खालच्या भागातील सिद्धेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे या धरणामध्ये अजूनही उणे १७.२५ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी या धरणात २२.२४ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता.

निम्नदुधना धरणातील एकूण पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी अद्याप उणे १७ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी निम्नदुधना धरणामध्ये २१.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला होता. जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा मध्यम प्रकल्पात ५ टक्के; तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात ८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुद्दगल येथील बंधा-यांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा आहे. परंतु मुळी येथील बंधाऱ्यांचे दरवाजे नादुरुस्त झाल्यामुळे या बंधाऱ्यांमध्ये केवळ ९.४४ टक्के पाणीसाठा आहे. डिग्रस बंधाऱ्यामध्ये ७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

रविवारी (ता.१३) सकाळी पैठण येथील जायकवाडी धरणात शंभर टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. जायकवाडीतून उजव्या कालव्याद्वारे ९०० क्युसेकने विसर्ग सुरू असल्यामुळे माजलगाव धरणात १.८६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला. डाव्या कालव्याद्वारे ७०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भूजल पातळीत वाढ व्हावी यासाठी परभणी जिल्ह्यातील डाव्या कालव्याच्या वितरण प्रणालीद्वारे पाणी सोडण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...