शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान

विद्यार्थ्यांनी केलेले हे काम अतिशय महत्त्वाचे आहे. गावाचा पाण्याचा प्रश्न कमी होणार आहे. परिसरातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत नक्कीच वाढ होणार आहे. - सविता निफाडे,सरपंच, शिरवाडे वणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरातून विद्यार्थ्यांवर श्रम संस्कार व्हावेत, त्यांच्या हातून जलसंधारणसारखे दीर्घकालीन काम उभे राहावे, हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी केलेले काम पाहता तो सफल झाला आहे. - प्रा. ज्ञानोबा ढगे, कार्यक्रम अधिकारी
water storage will increase in the  Shirwade Wani area
water storage will increase in the Shirwade Wani area

नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत आणि कला वाणिज्य महाविद्यालय वडनेर भैरव यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर शिरवाडे वणी येथे झाले. या शिबिरात स्वयंसेवकांनी काजळी नदीवरती साडेसोळा मीटर लांबीचा आणि अडीच मीटर उंचीचा दगडमातीचा बंधारा श्रमदानातून तयार केला. त्यामुळे परिसरातील पाणीसाठा वाढणार आहे. जलसंधारणासाठी विद्यार्थ्यांनी श्रमदान केल्यानिमित्त त्यांचे कौतुक होत आहे. 

निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे मागील वर्षी काजळी नदीचे केलेले विस्तारीकरण, खोलीकरणातून पाणी साठवण झाली होती. आता श्रमदानातून बंधाऱ्याची निर्मिती झाल्याने मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढणार आहे. शिबिरातील सहभागी विद्यार्थी व अधिकाऱ्यांनी नदीत पाणी असूनही पाण्यात उतरून काम केले. या बंधाऱ्यामुळे  जवळपास २१ लाख ७६ हजार लिटर पाण्याचा साठा तयार होणार आहे. या जल संधारणाच्या कामामुळे आता टंचाईच्या काळात गावाला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही. 

प्राचार्य डॉ. आर. डी दरेकर व प्राचार्य अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानोबा ढगे, प्रा. ज्ञानेश्वर भगूरे, प्रा. सचिन कुशारे आदींनी काम पाहिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com