Agriculture news in marathi water storage will increase in the Shirwade Wani area | Agrowon

शिरवाडे वणीत जलसंधारणासाठी विद्यार्थ्यांचे श्रमदान

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 जानेवारी 2020

विद्यार्थ्यांनी केलेले हे काम अतिशय महत्त्वाचे आहे. गावाचा पाण्याचा प्रश्न कमी होणार आहे. परिसरातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीत नक्कीच वाढ होणार आहे.
- सविता निफाडे, सरपंच, शिरवाडे वणी

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिरातून विद्यार्थ्यांवर श्रम संस्कार व्हावेत, त्यांच्या हातून जलसंधारणसारखे दीर्घकालीन काम उभे राहावे, हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी केलेले काम पाहता तो सफल झाला आहे.
- प्रा. ज्ञानोबा ढगे, कार्यक्रम अधिकारी

नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत आणि कला वाणिज्य महाविद्यालय वडनेर भैरव यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर शिरवाडे वणी येथे झाले. या शिबिरात स्वयंसेवकांनी काजळी नदीवरती साडेसोळा मीटर लांबीचा आणि अडीच मीटर उंचीचा दगडमातीचा बंधारा श्रमदानातून तयार केला. त्यामुळे परिसरातील पाणीसाठा वाढणार आहे. जलसंधारणासाठी विद्यार्थ्यांनी श्रमदान केल्यानिमित्त त्यांचे कौतुक होत आहे. 

निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे मागील वर्षी काजळी नदीचे केलेले विस्तारीकरण, खोलीकरणातून पाणी साठवण झाली होती. आता श्रमदानातून बंधाऱ्याची निर्मिती झाल्याने मोठ्या प्रमाणात जलसाठा वाढणार आहे. शिबिरातील सहभागी विद्यार्थी व अधिकाऱ्यांनी नदीत पाणी असूनही पाण्यात उतरून काम केले. या बंधाऱ्यामुळे  जवळपास २१ लाख ७६ हजार लिटर पाण्याचा साठा तयार होणार आहे. या जल संधारणाच्या कामामुळे आता टंचाईच्या काळात गावाला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही. 

प्राचार्य डॉ. आर. डी दरेकर व प्राचार्य अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानोबा ढगे, प्रा. ज्ञानेश्वर भगूरे, प्रा. सचिन कुशारे आदींनी काम पाहिले.

 


इतर बातम्या
राज्यात २३ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटपमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या...
दुधासाठीचा हमीभाव आम्हाला लागू नाही;...पुणे : राज्यातील जादा दूध खरेदी अनुदान योजना फक्त...
कोरोनाच्या जनुकीय आराखड्यासाठी प्रयत्न...नवी दिल्ली : ‘कोविड -१९' (कोरोना) विषाणूचा जनुकीय...
...अन् तामिळनाडूत महाराष्ट्रातील ऊसतोड...नवी दिल्ली : पोटाची खळगी भरण्यासाठी थेट...
‘लॉकडाउन’मध्ये कमाल... शेतकऱ्याच्या...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : लॉकडाउन न सारच थांबल......
हापूसची १०५ टन निर्यातरत्नागिरी ः हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी...
कोठारी ग्रुपतर्फे पंधरा लाखांचा मदत...सोलापूर ः कोरोना संकटात प्रशासनाला मदत व्हावी,...
यूपीएल लिमिटेडकडून पंतप्रधान मदत निधीला...पुणे : भारतातील सर्वात मोठी पीक संरक्षण...
मदतीच्या झऱ्याने ओलावले शिवार; अतिरिक्त...कोल्हापूर: दररोज निघणारा व बाजारपेठेत उठाव...
कृषीशास्त्रज्ञांचा व्हिडीओ...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
वरूडमध्ये ‘कोरोना’मुळे बागांतील...जालना : जवळपास दीडशे एकरवर विस्तारलेल्या...
वर्धा जिल्ह्यात दूध, भाजीपाल्यावर आयात...वर्धा ः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ‘कोरोना’...
राज्यात कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी वर्धा ः शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याबाबत सीसीआय...
हरभरा, तूर विक्रीसाठी गावातच नोंदणीची...अर्धापूर, जि. नांदेड : ‘‘‘कोरोना’च्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८५ व्यक्ती ‘होम...सिंधुदुर्ग : ‘‘‘होम क्वारंटाईन’ केलेल्या ८५...
घरातील कापूस खरेदी करा, महिला...परभणी : उन्हाळा सुरु झाला आहे. तापमानात वाढ...
सोलापुरात १२७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह सोलापूर : ‘कोरोना’चे संशयित असलेल्या जिल्ह्यातील...
‘उजनी’तून सोडले सोलापूरसाठी पाणी सोलापूर : सोलापूर शहरातील लोकांना पिण्याच्या...
बीड जिल्ह्यातील तूर, हरभऱ्याची केवळ...बीड : ‘‘जिल्ह्यात हमी दराने तूर व हरभरा खरेदीसाठी...
सांगली जिल्ह्यात डाळिंबांच्या विम्याचे...सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ,...