Agriculture news in marathi Water stored in projects in drought prone areas of Khandesh | Agrowon

खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत साठले पाणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे व त्यापेक्षा अधिक रिकामे मध्यम प्रकल्प तीन दिवसांपूर्वीच्या पावसात बऱ्यापैकी भरले आहेत. 

जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे व त्यापेक्षा अधिक रिकामे मध्यम प्रकल्प तीन दिवसांपूर्वीच्या पावसात बऱ्यापैकी भरले आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील अंजनी प्रकल्प १०० टक्के भरला आहे. नदीत प्रवाही पाणी असून, दोन दिवसांपूर्वी अंजनी नदीला चांगला पूर आला होता. पारोळा तालुक्यातील भोकरबारी प्रकल्पदेखील सुमारे ८० टक्के भरला आहे. जामदा बंधाऱ्यातून या प्रकल्पात पाणी सोडण्यात आले होते. त्यासाठी एरंडोल व अमळनेर भागातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. साक्री (जि.धुळे) तालुक्यातील बुराई प्रकल्पदेखील ८३ टक्के भरला आहे. हा प्रकल्प गेल्या वर्षी सुमारे सात वर्षांनंतर पूर्ण भरला होता. 

जूनमध्ये बुराई प्रकल्पात जेमतेम जलसाठा शिल्लक होता. साक्री, धुळे भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. परंतु, हा प्रकल्प रिकामाच होता. नंदुरबार व साक्री तालुक्याच्या सिमेनजीक हा प्रकल्प आहे. त्याच्या लाभक्षेत्रात पाऊस जेमतेम होत असतो. परंतु, त्यातही समाधानकारक जलसाठा आहे. अंजनी, भोकरबारी, बुराई या प्रकल्पांची साठवण क्षमता प्रत्येकी दोन, २.११, तीन टीएमसी एवढी आहे. 

तापी, गिरणा नदीत प्रवाही पाणी

तापी व गिरणा नदीत प्रवाही पाणी आहे. गिरणा नदीला बुधवारी (ता.२३) बऱ्यापैकी पूर आला होता. पूर ओसरला आहे. तापी नदीमधील पूरही ओसरला आहे. जामनेरातील वाघूर, शिरपूर (जि.धुळे) येथील अनेर, साक्री भागातून येणाऱ्या पांझरा, शहादा (जि.नंदुरबार) मधील सुसरी, गोमाई, तळोदा भागातील खरडी, रावेर (जि.जळगावमधील) सुकी, यावल (जि.जळगाव) मधील मोर, चोपडा (जि.जळगाव) मधील सातपुडा पर्वतातून येणारी गूळ या नद्यांना प्रवाही पाणी आहे. 

हे प्रकल्प १०० टक्के भरले

जळगाव जिल्ह्यातील गिरणा, बहुळा, अग्नावती, हिवरा, तोंडापूर, सुकी, अभोरा, मंगरूळ, गारबर्डी, मोर, गूळ, तोंडापूर, अंजनी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. धुळ्यातील अनेर, पांझरा, कनोली, मालनगाव, सोनवद, नंदुरबारमधील दरा, रंगावली, सुसरी या प्रकल्पात १००टक्के जलसाठा आहे. तापी नदीवरील भुसावळ (जि.जळगाव) नजीकच्या हतनूर धरणातही ७६ टक्के जलसाठा आहे. त्यात पाण्याची आवक कायम आहे. यामुळे त्याचे चार दरवाजे पूर्ण उघडले आहेत. त्याच्या सांडव्यातून पाणी सोडले जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...