Agriculture news in marathi Water supply by 13 tankers in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

सोलापूर : जिल्ह्यात आतापर्यंत ४० गावांमध्ये १३ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत टंचाई काहिशी उशिरा आणि कमी प्रमाणात जाणवत आहे.

सोलापूर : जिल्ह्यात आतापर्यंत ४० गावांमध्ये १३ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत टंचाई काहिशी उशिरा आणि कमी प्रमाणात जाणवत आहे. आता मॉन्सूनही अवघ्या काही दिवसांवर आल्याने ही टंचाईही संपण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर या भागात टंचाईच्या झळा दरवर्षी अधिक जाणवतात. गतवर्षी पावसाळी हंगामाच्या शेवटी चांगला पाऊस झाल्याने टंचाईच्या झळा कमी जाणवत आहेत. त्यातच जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धऱणातही यंदा शंभर टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळेही टंचाई तुलनेने कमी जाणवली. पण, आता जून महिन्यामध्ये टंचाई सुरु झाली. त्यातही दरवर्षी ठरलेल्या गावांचाच समावेश अधिक आहे. 

प्रशासनाने टंचाईचे नियोजन केले आहे. मागणीप्रमाणे त्या-त्या गावाला टँकर दिला जाते आहे. तहसिल आणि प्रांतस्तरावर त्यासाठी सूचना दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, मोहोळ व सांगोल्यात प्रत्येकी एक, माढ्यात सहा आणि करमाळ्यात तीन असे १३ टँकर सुरु आहेत. या तालुक्यातील जवळपास ४० गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा होतो आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...