वारीतील पाणीपुरवठा, स्वच्छतेवर भर : अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे

वारीतील पाणीपुरवठा, स्वच्छतेवर भर : अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे
वारीतील पाणीपुरवठा, स्वच्छतेवर भर : अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे

पंढरपूर, जि. सोलापूर  : आषाढी यात्रा कालावधीत संबंधित यंत्रणेने सतर्क राहून पाणीपुरवठा व स्वच्छतेचे योग्य नियोजन करावे. पालखी सोहळ्यासमवेत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा देण्याबाबत योग्य नियोजन करा, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिल्या.

आषाढी यात्रेच्या पूर्व तयारीबाबत प्रांत कार्यालय, सांस्कृतिक भवन पंढरपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यात शिंदे बोलत होते. अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, शमा ढोक-पवार, ज्योती कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, तहसीलदार मधुसूदन बर्गे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्राधान्य द्यावे. पालखी मार्गावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टँकर भरण्याच्या ठिकाणी पाणी उपलब्धतेबाबत नियोजन करावे. आरोग्य विभागाने औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करावा, आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करावे. वैद्यकीय पथक नेमलेल्या ठिकाणाबाबतची प्रसिध्दी करावी . नगर पालिका विभागाने ६५ एकर, वाळवंट स्वच्छ पिण्याचे उपलब्ध करावे, शहरात व मंदिर परिसरात स्वच्छता राहील, याची दक्षता घ्यावी.’’

‘‘६५ एकर मध्ये प्लॉटचे वाटप करताना संबंधितांना प्लॉटचे नंबर उपलब्ध करावे. शहरातील धोकादायक इमारतीवर ठळक अक्षरात दक्षतेबाबतचे सूचना फलक लावावे. वीज वितरण विभागाने वारी कालावधीत अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा करावा. वाहतूक व पोलिस विभागाने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावा. पाटबंधारे विभागने वेळेत कॅनालला पाणी सोडण्याचे नियोजन करावे. प्रशासनातर्फे  २ जुलै २०१९ रोजी प्रदक्षिणामार्ग व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात येईल,`` असेही त्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com