Agriculture news in marathi Water supply to the house, the tap connection to the house, | Agrowon

घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर  केंद्राची जलजीवन योजना

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी शुद्ध आणि मुबलक पाणी देता यावे; यासाठी केंद्र शासनाकडून जलजीवन योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात अन्‌ प्रत्येक घरात नळ कनेक्‍शन देऊन चोवीस तास पाणी दिले जाणार आहे. नळ कनेक्‍शन देतानाच त्याला मीटर बसविले जाणार असून, त्यानुसार पाणीबिल आकारणी केली जाणार आहे. 

जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी शुद्ध आणि मुबलक पाणी देता यावे; यासाठी केंद्र शासनाकडून जलजीवन योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात अन्‌ प्रत्येक घरात नळ कनेक्‍शन देऊन चोवीस तास पाणी दिले जाणार आहे. नळ कनेक्‍शन देतानाच त्याला मीटर बसविले जाणार असून, त्यानुसार पाणीबिल आकारणी केली जाणार आहे. 

केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या जलजीवन योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून आराखडा तयार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक तालुक्‍याच्या गटविकास अधिकारी यांच्याकडून २० फेब्रुवारीपर्यंत आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली. 

ग्रामीण भागातील गाव, पाड्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यामुळे केंद्र शासनाने जलजीवन अभियान हाती घेऊन २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी देण्यासाठी योजना सुरू केली आहे. योजनेसाठी जिल्हाभरातून प्रत्येक गटविकास अधिकारीनिहाय गावांचे आराखडे तयार करून सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. हे आराखडे प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरावरून शासनाकडे २ मार्चला आराखडा सादर केला जाणार आहे. योजनेसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीमधून अभियान राबविले जाणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
कारखानदारांनी कामगारांची सोय न केल्यास...कोल्हापूर  ः सर्व कारखानदारांनी त्यांचे काम...
नगर जिल्ह्यात रोज २६ लाख लिटर दूध संकलननगर  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तीन जिल्ह्यांतील ३९ मंडळात पावसाची...औरंगाबाद : एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव...
शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दूर करा ः विजय... नागपूर  ः कोरोना विषाणू नियंत्रणासाठी...
‘कृषी निविष्ठा विक्री केंद्र सम-विषम...परभणी ः कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर...
जळगाव जिल्ह्यात थेट बाजारासाठी शेतकरी...जळगाव ः ग्राहकांना दर्जेदार, आवाक्‍याच्या दरातील...
लासलगाव बाजार समितीचे कामकाज पुन्हा बंद नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे लासलगाव...
मेट्रो सिटीतील आऊटलेटमधून संत्रा विकानागपूर ः मदर डेअरी, एनडीडीबीच्या देशाच्या मुख्य...
पीककर्ज परतफेडीबाबत शेतकऱ्यांमध्ये...पुणे ः पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने परिपत्रक जारी...
परभणीत शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक परवाने...परभणी ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
सांगलीत भाजीपाला लावगडीकडे शेतकऱ्यांनी...सांगली : ‘कोरोना’च्या वाढत्या धोक्यामुळे आणि...
नांदेड, परभणी, हिंगोलीत वादळी पावसाने...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक...
गोंदिया जिल्हा बॅंकेची कर्जपरतफेडीस...गोंदिया ः ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर देशभरात...
कमी दरात काजू खरेदीचा काही दलालांचा...सिंधुदुर्ग ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
सोनुर्ली येथील स्वस्त धान्य दुकानाचा...चंद्रपूर : स्वस्त धान्य दुकानातील धान्याची...
सोलापूरच्या पालकमंत्रीपदी जितेंद्र...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री...
मालेगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्रे...वाशीम  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
जळगावात खासगी डेअरी चालक,...जळगाव  ः जिल्ह्यात दुधाच्या वितरणात येणाऱ्या...
पुणे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य...पुणे  : ‘कोरोना’ या राष्ट्रीय आपत्ती...
अत्यावश्यक सेवेतील शेतीमाल वाहतुकीस...सोलापूर  ः अत्यावश्यक सेवा म्हणून माल वाहतूक...