agriculture news in marathi, Water supply in Marathwada projects decreased | Agrowon

मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा घटला

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत नसल्याने मराठवाड्यातील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट नोंदली गेली आहे. ही घट गत आठवड्याच्या तुलनेत किंचित असली, तरी भर पावसाळ्यात ती नोंदली गेल्याने चिंता वाढविणारी आहे.

औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत नसल्याने मराठवाड्यातील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी घट नोंदली गेली आहे. ही घट गत आठवड्याच्या तुलनेत किंचित असली, तरी भर पावसाळ्यात ती नोंदली गेल्याने चिंता वाढविणारी आहे.

मराठवाड्यातील मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये केवळ १९.५५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गत आठवड्यात २२.८६ टक्‍के असलेला ११ मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा २१.९७ टक्‍क्‍यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिद्धेश्वर, सिनाकोळेगाव या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. मध्यम प्रकल्पांची स्थितीही अवघड आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत केवळ १५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गत आठवड्यात तो १५.३४ टक्‍के इतका होता. गत आठवड्यात १२.५६ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा असलेल्या ७४६ लघू प्रकल्पांमध्ये केवळ १२.२७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.

गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांतील उपयुक्‍त पाणीसाठा ३३.४० टक्‍क्‍यांवरून घटून ३३.२४ टक्‍क्‍यांवर आला आहे. दुसरीकडे तेरणा मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमधील पाणीसाठाही २८.६० टक्‍क्‍यांवरून २७.६० टक्‍क्‍यांवर आला आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत सुरू असलेले पाण्याचे टॅंकर व कायम असलेले पाणी पुरवठ्यासाठीचे विहिरींचे अधिग्रहण भूजल स्थितीही स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

२९८ लघू प्रकल्पात ५ टक्‍क्‍यांच्या आत उपयुक्‍त पाणीसाठा
मराठवाड्यातील ७४६ लघू प्रकल्पांपैकी तब्बल २९८ लघू प्रकल्पांमध्ये ५ टक्‍क्‍यांच्या आतच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील तेरा प्रकल्पात ५ टक्‍के, परभणीमधील २२ प्रकल्पातही ५ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पात ३ टक्‍के, तर जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पांत केवळ १ टक्‍का उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. लातूर जिल्ह्यातील १३२ प्रकल्पात १० टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

३५ मध्यम प्रकल्पांची स्थिती अवघड
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल ३५ मध्यम प्रकल्पांची स्थिती उपयुक्‍त पाणीसाठ्याबाबत अवघड बनली आहे. या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १३, जालना जिल्ह्यातील २, बीड जिल्ह्यातील ९, लातूर जिल्ह्यातील ३, उस्मानाबाद जिल्ह्यातील ५, नांदेडमधील २ व परभणी जिल्ह्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

 


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी सक्षमीकरण हेच असावे धोरण यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. बेताबेताने...
अवजारे, अनुदान अन् अनागोंदीअवजारे अनुदानाच्या योजना आणि त्यातील अनागोंदींचे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी...पुणे ः मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा,...
निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून...
‘जाॅइंट अॅग्रेस्को’ आजपासून अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व...
निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी ...अकोला ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले...
कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी...नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण...
पावसाने सोयाबीनचे आगार उद्ध्वस्त वाशीमः वेळ दुपारची...काही भागात ऊन होते...काही...
प्रदूषणावर तोडग्यासाठी लवकरच कायदा :...नवी दिल्ली : शेतातील काडीकचरा जाळण्याचे प्रकार...
राज्यात १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे...पुणे: राज्यात यंदा जास्त ऊस उत्पादनाची शक्यता...
शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊसतोडणी...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्‍नावर तोडगा...
बारकाईने जाणून घ्या शेतकरी अपघात विमा...राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...