agriculture news in marathi, water supply minister says, take a action against well and bore holders, mumbai, maharashtra | Page 2 ||| Agrowon

नियमांचे उल्लंघन करून विहिरी, बोअर घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : बबनराव लोणीकर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जुलै 2019

मुंबई : भूगर्भातील पाण्याच्या उद्‍भवापासून पाचशे मीटर परिसरातील विहिरी आणि बोअरचे सर्वेक्षण करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी (ता. १) विधानसभेत दिली. 

राज्यातील विशेषतः पश्चिम विदर्भातील भूजलपातळीत वाढ व्हावी, यासाठी कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात आमदार संजय पोतनीस यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री लोणीकर बोलत होते.

मुंबई : भूगर्भातील पाण्याच्या उद्‍भवापासून पाचशे मीटर परिसरातील विहिरी आणि बोअरचे सर्वेक्षण करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी (ता. १) विधानसभेत दिली. 

राज्यातील विशेषतः पश्चिम विदर्भातील भूजलपातळीत वाढ व्हावी, यासाठी कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात आमदार संजय पोतनीस यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री लोणीकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले, की राज्यात सातत्यपूर्ण भूजल उपलब्ध व्हावे, तसेच भूजलाचे स्रोत संरक्षित करण्यात यावेत, यासाठी भूजलाचे विकास व व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ राज्यात १ जून २०१४ पासून लागू करण्यात आला आहे. तसेच, राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणलोटाची कामे, साखळी सिमेंट नालाबांध, जुने अस्तित्वातील नालाबांध, जलस्रोतांतील गाळ काढणे, जलस्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण यांसारखी कामे होत आहेत. मात्र, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राज्यात कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा मांडला.

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी पाण्याच्या उद्‍भवापासून पाचशे मीटर अंतरात विहीर आणि बोअर घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार का? असा सवाल केला. त्यावर मंत्री लोणीकर यांनी पाण्याच्या उद्‍भवापासून ५०० मीटर परिसरातील विहीर आणि बोअरचे सर्वेक्षण करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले. तसेच अधिवेशन झाल्यावर आठवडाभरात या विषयावर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले.  

दरम्यान, राष्ट्रीय पेयजल योजनेतून राज्यातील सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर स्वयंचलित करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारल्याची माहिती मंत्री लोणीकर यांनी विधानसभेत दिली. जेऊर, कोर्टी, बोरगाव आणि कव्हे (करमाळा जि. सोलापूर) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर स्वयंचलित करण्याबाबत आमदार नारायण पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 
 
प्लॅस्टिकबंदीची मुदत वाढणार नाही ः कदम
राज्यातील प्लॅस्टिकबंदीची मुदत वाढणार नाही. राज्यात ८० टक्के प्लॅस्टिक गुजरातमधून येते. गुजरातमधे प्लॅस्टिक बंदीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली. आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते.

या वेळी अजित पवार म्हणाले, की अचानक प्लॅस्टिक बंदीने नागरिक घाबरले होते. आता सर्रास प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. रामदास कदम म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत प्लॅस्टिकविरोधी कारवाई थांबली होती. पुढील आठ दिवसांत कारवाईचे परिणाम दिसतील. 


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...