नगर जिल्ह्यात एकशे तीन टॅंकरने पाणीपुरवठा

नगर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने गावशिवारात टंचाईचे सावट जाणवत आहे. पाहता पाहता टॅंकरने शतक पार केले. जिल्ह्यातील ९३ गावे व ४०३ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ८३ हजार ७३८ नागरिकांची तहान भागविण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे १०३ टॅंकर धावत आहेत.
Water supply by one hundred and three tankers in Nagar district

नगर जिल्ह्यात गतवर्षी पुरेसा पाऊस नव्हता. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करताना टॅंकरच्या संख्येने १८ वर्षांचा विक्रम मोडत नवा उच्चांक गाठला. जिल्ह्यातील ५७२ गावे व ३२०० वाड्या-वस्त्यांवरील साडेतेरा लाख नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाला तब्बल ८२७ टॅंकर सुरू करावे लागले होते. मात्र, नंतर परतीच्या पावसाने धुव्वाधार बरसात केली. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची स्थिती चांगली राहिली. परिणामी, टॅंकरची मागणी उशिरा आली.

यंदा एप्रिलच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या पठार भागातून टॅंकरचे प्रस्ताव येण्यास सुरवात झाली. सुरवातीला टॅंकरमंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे होते. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम लक्षात घेऊन सरकारने ते प्रांताधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी व राहाता हे तालुके वगळता आजअखेर जिल्ह्यातील १० तालुक्‍यांमध्ये टॅंकरद्वारे तब्बल एक लाख ८४ हजार नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रशासन करीत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com