Agriculture news in marathi Water supply scheme Under the burden of electricity | Agrowon

पाणीपुरवठा योजना वीजबिलाच्या ओझ्याखाली

सोमवार, 5 एप्रिल 2021

 नागरिकांना पिण्याचे पाणी पोचविण्यासाठी अस्तित्वात आलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वीजबिलाच्या ओझ्याखाली दबल्या आहेत. प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे देयक २ कोटी १९ लाखांवर पोचल्याने वसुलीसाठी वीज जोडण्या तोडल्या होत्या.

अकोला : खारपाण पट्ट्यातील हजारो नागरिकांना पिण्याचे पाणी पोचविण्यासाठी अस्तित्वात आलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वीजबिलाच्या ओझ्याखाली दबल्या आहेत. महिनोमहिने देयके भरले जात नसल्याने जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे देयक २ कोटी १९ लाखांवर पोचल्याने वसुलीसाठी वीज जोडण्या तोडल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने तजवीज करून ६० लाख रुपये भरले. मात्र, योजनांवरील गंडांतर टळलेले नाही.  
जिल्हा परिषदेच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची थकबाकी २ कोटी १९ लाखापर्यंत पोचली आहे. गेल्या महिन्यात महावितरणने वसुलीच्या उद्देशाने वीज कपात केल्याने एकच कल्लोळ झाला. दबाव वाढल्याने प्रशासनाने पळापळ करीत ६० लाख रुपये महावितरणकडे जमा केले. परिणामी सध्या तरी ६४ खेडी खांबोरा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि ८४ खेडी पाणीपुरवठा योजना, असा दोन्ही योजनांचा विद्युत पुरवठा सुरू आहे.

या योजनांचा डोलारा हा पाणीपट्टी वसुलीवर अवलंबून असतो. परंतु या योजनांची पाणीपट्टी वसुली करण्याकडे जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी फारसे लक्ष देत नाहीत. परिणामी पाणीपट्टी वसुलीची थकबाकी प्रत्येक वर्षी काही कोटींच्या घरात जाऊन पोहचते. आर्थिक वर्षाच्या शेवटी पंचायत विभाग पाणीपट्टी वसुलीसाठी आराखडा तयार करून त्यावर काम करतो व काही प्रमाणात पाणीपट्टी वसुली होते. नंतर पुन्हा दुर्लक्ष होते. यामुळे पाणीपट्टी वसुलीची थकबाकी कमी होण्यापेक्षा वाढत राहते. आता पुन्हा हाच प्रश्‍न निर्माण 
झालेला आहे.

आता ६० लाख भरल्याने काही दिवसांचा दिलासा मिळाला खरा, मात्र येत्या काळात अशी परिस्थिती उद्भवणार नाही, या बाबत कुणीही खात्रीने सांगू शकत नाही.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...