Agriculture news in marathi Water supply started by 324 tankers in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात ३२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

टीम अॅग्रोवन
रविवार, 31 मे 2020

औरंगाबाद : मराठवाड्यातील २५१ गाव व ९८ वाड्यांतील ५ लाख ८१ हजार ९५० लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी ३२४ टँकर सुरू आहेत. जवळपास १००८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील २५१ गाव व ९८ वाड्यांतील ५ लाख ८१ हजार ९५० लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी ३२४ टँकर सुरू आहेत. जवळपास १००८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील १३६ गावे व २७ वाड्यांमधील २ लाख ९० हजार ११७ लोकांना पाणीटंचाई भासत आहे. म्हणून १२० टँकर सुरू आहेत. १४२ विहिरीचे टँकर व टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर हे तालुके टंचाईचा रडारवर आहेत. जालना जिल्ह्यातील जालना, बदनापूर, जाफराबाद, अंबड या चार तालुक्यांतील २९ गावे व ११ वाड्यांमधील ६९७५९ लोकांना पाणी टंचाई भासते आहे. तिथे ४१ टँकर सुरू आहेत. ६४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

परभणी जिल्ह्यातील एका गावातील २५०० लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी एका टँकरद्वारे णीपुरवठा सुरू आहे. याशिवाय ३३ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, कंधार, मुखेड, किनवट तालुक्यातील ३ गाव व १५ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. या १८ गावे, वाड्यांमधील १९७१५ लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी १३ टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील १११ विहिरीचे अधिग्रहण केले आहे. 

बीड जिल्ह्यातील वडवणी व परळी वगळता सर्व तालुक्यातील ६६ गाव व ४५ वाड्यांमधील १८०८९३ लोकांना पाणीटंचाईचा जाणवत आहे. पाणी पुरवण्यासाठी १२१ टँकरची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील दोन गावातील ४१०२ लोकांना पाणी टंचाई भासत आहे. त्यांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी दोन टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. जिल्ह्यातील २६९ विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले. 

उस्मानाबादच्या १४ गावांत टंचाई

उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, उमरगा, कळंब, भूम, परंडा या तालुक्यातील १४ गावांमधील १२ हजार ९६४ लोकांना पाणी भासत आहे. ही टंचाई निवारण्यासाठी १६ टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यातील २१२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले, अशी माहिती विभागीय आयुक्तालयातर्फे देण्यात आली. 
 

 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...