परभणी जिल्ह्यातील ९२ हजार नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

परभणी जिल्ह्यातील ९२ हजार नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
परभणी जिल्ह्यातील ९२ हजार नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

परभणी ः यंदाच्या पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे अद्याप पाणीपुरवठ्याच्या स्रोतांना पाणी आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६८ लोकवस्त्यांवरील ९२ हजार ८६७ जनतेला ८ शासकीय आणि ५५ खासगी मिळून एकूण ६३ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात आजवरच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. लहान, मध्यम, मोठ्या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे जलाशयामध्ये उपयुक्त पाणीसाठा जमा झालेला नाही. वाढते तापमान, बाष्पीभवनामुळे उणे पाणीसाठ्यातून घट होत आहे.

विहिरी, बोअरच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. वाढत्या उपशामुळे पाणीपुरवठा स्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गडद होत आहे. टंचाई स्थितीमुळे जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील ६ गावांना ४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिंतूर तालुक्यातील १० लोकवस्त्यांना १० टॅंकरने, सेलू तालुक्यातील ५ लोकवस्त्यांना ५ टॅंकरद्वारे, मानवत तालुक्यातील ३ लोकवस्त्यांना ३ टॅंकरद्वारे, पाथरी तालुक्यात १ टॅंकर, सोनपेठ तालुक्यातील ३ लोकवस्त्यांना ३ टॅंकरद्वारे, गंगाखेड तालुक्यातील १० लोकवस्त्यांना १० टॅंकरद्वारे, पालम तालुक्यातील १४ लोकवस्त्यांना १६ टॅंकरद्वारे, पूर्णा तालुक्यातील १० लोकवस्त्यांना ११ टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅंकर सुरू असलेल्या गावांमध्ये परभणी तालुक्यातील सिंगणापूर, माळसोन्ना, गोविंदपूर-इस्माइलपूर-सारंगपूर, उजळंबा, पालम तालुक्यातील चाटोरी, नाव्हा, आनंदवाडी, रामापूर तांडा, पेंडू खुर्द, पेठशिवणी, पेठपिंपळगाव, सातेगाव, फुरतलाव तांडा, गंजी तांडा, पायरिका तांडा, वाडी बु., मार्तंडवाडी, नरहटवाडी, पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे, बरबडी, देगांव, हिवरा, पांगरा लासिना, पिंपळा भत्या, धोतरा, वाई लासिना, निळा, गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा, उमरानाईक तांडा, खंडाळी, सिरसम, सुरळवाडी, महातपुरी तांडा, उमटवाडी, ढवळकेवाडी, फाजुनाईक तांडा, गुंजेगांव, सोनपेठ तालुक्यातील नरवाडी, कोथाळा, खपाट पिंपरी, पाथरी तालुक्यातील कान्सूर तांडा, सेलू तालुक्यातील तळतुंबा, पिंपरी रोडगे, नागठाणा कुंभारी, पिंपळगांव गोसावी, गुळखंड, जिंतूर तालुक्यातील पांगरी, मांडवा, देवसडी, रायखेडा, बोरवाडी, मोहाडी, धमधम, वाघी धानोरा, वडी, घागरा, मानवत तालुक्यातील पाळोदी, हत्तलवाडी, सावळी या गावांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com