agriculture news in marathi, Water supply through 75 tankers in rural areas | Agrowon

परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 मे 2019

परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत आहे. लोकवस्त्यांवरील जलस्रोत आटल्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मंगळवार (ता. २१) पर्यंत जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ७० लोकवस्त्यांवरील १ लाख १३ हजार ४३३ एवढ्या लोकसंख्येला ७५ टॅंकर पाणी पुरवित आहेत. टंचाईग्रस्त गावातील एकूण ३२९ विहिंरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत आहे. लोकवस्त्यांवरील जलस्रोत आटल्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मंगळवार (ता. २१) पर्यंत जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ७० लोकवस्त्यांवरील १ लाख १३ हजार ४३३ एवढ्या लोकसंख्येला ७५ टॅंकर पाणी पुरवित आहेत. टंचाईग्रस्त गावातील एकूण ३२९ विहिंरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

यंदाच्या मे महिन्यात जिल्ह्यतील तापमानाचा पारा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहात आहे. उपसा वाढल्यामुळे जलाशये, विहिरी, कूपनलिका कोरड्या पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या जिल्ह्यातील पालम तालुक्यात सर्वाधिक २० टॅंकर असून, १७ लोकवस्त्यांना त्याद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 

परभणी तालुक्यातील दोन लोकवस्त्यांसाठी १ टॅंकर, जिंतूर तालुक्यात १६ लोकवस्त्यांसाठी १४ टॅंकर, सेलू तालुक्यात ९ लोकवस्त्यांसाठी १० टॅंकर, मानवत आणि सोनपेठ तालुक्यात प्रत्येकी ५ लोकवस्त्यांसाठी ५ टॅंकर सुरू आहेत. गंगाखेड तालुक्यात ८ लोकवस्त्यांसाठी ९ टॅंकर आणि पूर्णा तालुक्यात ८ लोकवस्त्यांसाठी ११ टॅंकर सुरू आहेत. 

७८ नळ योजनांची विशेष दुरुस्ती...

पाणीटंचाई निवाणार्थ जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये विविध 
उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये ७८ गावांतील नळयोजनांची विशेष दुरुस्ती केली जात आहे. १५ ठिकाणी तात्पुरत्या पूरक नळयोजना सुरू केल्या जात आहेत. ७१ ठिकाणी नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. एकूण ३२९ विहिंरीचे अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...