मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित चित्र
संग्रहित चित्र

औरंगाबाद   : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड व उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील जवळपास साडेसात लाख जनतेची तहान आता टॅंकरवर अवलंबून आहे. सध्या पाच जिल्ह्यांत पाणीपुरवठा करण्यासाठी ४०५ टॅंकरची सोय करण्यात आली असून, संपूर्ण मराठवाड्यात जवळपास ३३६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

गत आठवड्यात मराठवाड्यातील २९६ गावे व ११ वाड्यांमध्ये पाणीटंचाईची झळ बसत होती. या गावे-वाड्यांना ३२ शासकीय टॅंकर तर ३४३ खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. चालू आठवड्यात टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत १५ ची भर पडली असून आता टंचाईग्रस्त गावांची संख्या ३११ वर पोचली आहे. टंचाईग्रस्त वाड्यांच्या संख्येत २ ची भर पडून ती संख्या आता १३ वर पोहचली आहे. खासगी टॅंकरच्या संख्या ३० ने वाढली असून ती आता ३७३ वर पोचली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याला सर्वाधिक झळा औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा बसत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील २७२ गावे व १० वाड्यांमधील ६ लाख १६ हजार ६५० नागरिकांना पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामध्ये गंगापूर तालुक्‍यातील ८५, पैठणमधील ५०, वैजापूर तालुक्यातील ४९, सिल्लोड तालुक्यातील ३५, औरंगाबादमधील २६ गावे ९ वाड्या, फूलंब्रीतील १० गावे, १ वाडी, कन्नड तालुक्‍यातील १० गावे तर खुलताबाद तालुक्‍यातील ७ गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी ३३५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून १८५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद, परतूर, अंबड, भोकरदन शहर, घनसांवगी आदी तालुक्‍यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्‍यात पाणीटंचाई आहे. बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, परळी वैजनाथ, पाटोदा नगर परिषदेला पाणीटंचाई भासत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मनाबाद, भूम, परांडा, यासह कळंब, वाशी आदी तालुक्‍यांतही पाणीटंचाई सुरू झाली आहे.  

टॅंकर स्थिती
जिल्हा  लोकसंख्या गाव/वाड्या टॅंकर संख्या विहीर अधिग्रहण
औरंगाबाद ६,१६,६५० २८२  ३३५ १८५
जालना ९१,६०५  २९ ५१ ६९
नांदेड   १२,६०० १ 
बीड  २४,०३८ १४ २२
उस्मानाबाद ६६३१ ३  ५८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com