agriculture news in Marathi water of takari reach in six talukas Maharashtra | Agrowon

ताकारी’चे सहा तालुक्यांना पाणी 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

ताकारी योजनेतून तीन आवर्तन देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार दोन आवर्तन पूर्ण झाली आहेत. तिसरे आवर्तन येत्या चार ते पाच दिवसात सोडण्यात येणार आहे. योजनेचे आवर्तन वेळेत सुरु होत असल्याने पाणी टंचाई कमी झाली आहे. 
- प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी, उपसा सिंचन योजना. 

सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या दोन आवर्तनांतून या लाभ क्षेत्रातील सहा तालुक्याला पाणी दिले. दोन आवर्तनातून सुमारे ३.१० टीएमसी पाणी उचलले असून तिसरे आवर्तन चार ते पाच दिवसांत सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली. 

ताकारी प्रकल्पात वाळवा, कडेगाव, खानापूर, पलूस, तासगाव आणि मिरज या सहा तालुक्यांचा समावेश असून २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र आहे. या योजनेतून ९.३४ टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी आहे. यंदा ताकारीचे पहिले आवर्तन २७ डिसेंबरला सुरु करण्यात आले.

या आवर्तनासाठी कृष्णा नदीतून १.३ टीएमसी पाणी उचलले होते. दुसरे आवर्तन ७ मार्च मध्ये सुरु करण्यात असून यासाठी १.७ पाण्याचा वापर झाला आहे. सहा तालुक्यांत १४४ किलोमीटर पर्यंत पाणी पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

यंदा चांगला पाऊस पडला असल्याने कोयना धरणात पाणीसाठा अधिक शिल्लक आहे. त्यामुळे आवर्तन करण्यास कोणतीही अडचण आली नाही. योजनेची दोन आवर्तने झाली असून ३.१० टीएमसी पाणी उचलले असून तिसरे आवर्तन लवकरच सुरु केले जाणार आहे.

तिसऱ्या आवर्तनासाठी २.४0 टीएमसी पाण्याचा वापर होईल. म्हणजे ताकारी योजनेतून ५.५0 टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. अर्थात, कोयना प्रकल्पातून ९.४३ पाणी उचलण्याची परवानगी आहे. त्यामुळे पाणी कमी लागल्याने ३.३८ टीएमसी पाण्याचा उपसा कमी झाला आहे. 

ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील मिरज तालुका शेवटचा आहे. या भागातील गतवर्षी मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाल्याने या भागात पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे द्राक्ष पिकाला शाश्वत पाण्याची सोय झाली आहे. मुळात दुष्काळी भागात दोन आवर्तने मिळाल्याने या भागातील पाण्याची पातळीत देखील वाढ झाली आहे. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...