नगरमध्ये टॅंकरवर राहणार सात पथकांचा ‘वॉच’

टॅंकरवर राहणार सात पथकांचा ‘वॉच’
टॅंकरवर राहणार सात पथकांचा ‘वॉच’

नगर : पावसाने दडी मारल्याने या वर्षी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे २१३ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या खेपांच्या मंजुरीप्रमाणे रोज पाणीपुरवठा होतो का, यावर पाणीपुरवठा समितीचे नियंत्रण आहे का, गावांमध्ये पाणी साठवणुकीची व्यवस्था काय, टॅंकरद्वारे होणारे पाणीवाटप हंडावाटपाने होते का, याची तपासणी करण्यासाठी जिल्हाभरात सात विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

पथकात नियुक्त करण्यात आलेले उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना तसे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या संगमनेर, कोपरगाव, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड या तालुक्‍यांतील गावांसह पारनेर नगरपंचायत हद्दीमध्येही टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टॅंकरच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, टॅंकरचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर संबंधित गावांना नियमित पाणीपुरवठा केला जात आहे का, याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके टॅंकर सुरू असलेल्या गावांमध्ये जाऊन तपासणी करणार आहेत.

या बाबींची होणार तपासणी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावामध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत निर्माण झाले किंवा कसे, गाव-वाडी यांच्यापासून दीड किलोमीटर अंतरात पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था आहे का, गावाच पिण्याच्या पाणीपुरवठ्याची योजना आहे किंवा कसे, आदी विचारात घेत, टॅंकरद्वारे निश्‍चित केलेल्या खेपा योग्य आहेत का आदी मुद्द्यांबाबत तपासणी करून अहवाल नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे फर्मान या पथकप्रमुखांना जारी करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com