राज्यात ३४ लाख घरांना मिळाला नळ

केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेत या वर्षी ४३ लाख घरांना नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते.
TAP WATER
TAP WATER

लातूर ः केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेत या वर्षी ४३ लाख घरांना नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत ३४ लाख घरांत नळ देण्यात यंत्रणेला यश आले आहे. नळजोडणी झाली असली, तरी शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणेसमोर असणार आहे.

राज्यात या मिशनअंतर्गत घरोघरी नळजोडणी देण्यात पुणे विभाग आघाडीवर आहे. पुणे विभागाला मार्च २०२१ पर्यंतचे सहा लाख ९६ हजार ९८९ नळ जोडणीचे उद्दिष्ट होते. या विभागाने २ मार्चपर्यंत सात लाख २९ हजार तीन घरांना नळजोडणी दिली आहे. तर ३१ मार्चपर्यंत आणखी ४६ हजार ४१४ नळजोडणीचे उद्दिष्ट घेतले आहे. नागपूर विभाग सर्वांत पिछाडीवर आहे. या विभागाला सहा लाख ४९ हजार ८८२ चे उद्दिष्ट होते आतापर्यंत तीन लाख ३९ हजार २४२ नळ जोडण्या दिल्या आहेत. आणखी सव्वातीन लाख नळजोडण्या दिलेल्या नाहीत.

दहा लाख जोडण्यांना हवी गती राज्यात २ मार्चपर्यंत ३४ लाख १५ हजार ८०५ घरांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. दहा लाख ७१ हजार ७९० जोडण्या देण्याचे शिल्लक आहे. ३१ मार्चपर्यंत हा या जोडण्या देणे अपेक्षित आहे. यात नागपूर विभागाच्या तीन लाख २९ हजार १६५, कोकण विभागाच्या तीन लाख १४ हजार ५०४, पुणे विभागाच्या ४६ हजार ४१४, नाशिक विभागाच्या ८३ हजार २६०, औरंगाबाद विभागाच्या एक लाख ५५ हजार ९०७, अमरावती विभागाच्या एक लाख ४२ हजार ५४० नळ जोडण्या शिल्लक आहेत. जे विभाग मागे आहेत, त्या विभागात नळ जोडण्याची गती वाढण्याची गरज आहे.

५५ लिटर शुद्ध पाणी या योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेत पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही किमान भारतीय दर्जा BISः १०५०० अशी असावी असे अपेक्षित आहे. पण राज्यात आजही अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून दिलेले जाणारे पाण्याचा दर्जा सुमार आहे. त्यामुळे या दर्जाकडेही शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

अशी आहे स्थिती

विभाग नळजोडणी शिल्लक 
कोकण ३,७४,४६७ ३,१४,५०४
पुणे ७,२९,००३ ४६,४१४
नाशिक ८,४२,५७०- ८३२६०
औरंगाबाद ७,००,०१७ १,५५,९०७
अमरावती ४,४०,६६४ १,४२,५४०
नागपूर ३,३९,२४२ ३,२९,१६५
एकूण ३४,२५,९६३ १०,७१,७९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com