agriculture news in Marathi water tap to 34 lac families in state Maharashtra | Agrowon

राज्यात ३४ लाख घरांना मिळाला नळ

हरी तुगावकर
शुक्रवार, 5 मार्च 2021

केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेत या वर्षी ४३ लाख घरांना नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते.

लातूर ः केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेत या वर्षी ४३ लाख घरांना नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत ३४ लाख घरांत नळ देण्यात यंत्रणेला यश आले आहे. नळजोडणी झाली असली, तरी शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणेसमोर असणार आहे.

राज्यात या मिशनअंतर्गत घरोघरी नळजोडणी देण्यात पुणे विभाग आघाडीवर आहे. पुणे विभागाला मार्च २०२१ पर्यंतचे सहा लाख ९६ हजार ९८९ नळ जोडणीचे उद्दिष्ट होते. या विभागाने २ मार्चपर्यंत सात लाख २९ हजार तीन घरांना नळजोडणी दिली आहे. तर ३१ मार्चपर्यंत आणखी ४६ हजार ४१४ नळजोडणीचे उद्दिष्ट घेतले आहे. नागपूर विभाग सर्वांत पिछाडीवर आहे. या विभागाला सहा लाख ४९ हजार ८८२ चे उद्दिष्ट होते आतापर्यंत तीन लाख ३९ हजार २४२ नळ जोडण्या दिल्या आहेत. आणखी सव्वातीन लाख नळजोडण्या दिलेल्या नाहीत.

दहा लाख जोडण्यांना हवी गती
राज्यात २ मार्चपर्यंत ३४ लाख १५ हजार ८०५ घरांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. दहा लाख ७१ हजार ७९० जोडण्या देण्याचे शिल्लक आहे. ३१ मार्चपर्यंत हा या जोडण्या देणे अपेक्षित आहे. यात नागपूर विभागाच्या तीन लाख २९ हजार १६५, कोकण विभागाच्या तीन लाख १४ हजार ५०४, पुणे विभागाच्या ४६ हजार ४१४, नाशिक विभागाच्या ८३ हजार २६०, औरंगाबाद विभागाच्या एक लाख ५५ हजार ९०७, अमरावती विभागाच्या एक लाख ४२ हजार ५४० नळ जोडण्या शिल्लक आहेत. जे विभाग मागे आहेत, त्या विभागात नळ जोडण्याची गती वाढण्याची गरज आहे.

५५ लिटर शुद्ध पाणी
या योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेत पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही किमान भारतीय दर्जा BISः १०५०० अशी असावी असे अपेक्षित आहे. पण राज्यात आजही अनेक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून दिलेले जाणारे पाण्याचा दर्जा सुमार आहे. त्यामुळे या दर्जाकडेही शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

अशी आहे स्थिती

विभाग नळजोडणी शिल्लक 
कोकण ३,७४,४६७ ३,१४,५०४
पुणे ७,२९,००३ ४६,४१४
नाशिक ८,४२,५७०- ८३२६०
औरंगाबाद ७,००,०१७ १,५५,९०७
अमरावती ४,४०,६६४ १,४२,५४०
नागपूर ३,३९,२४२ ३,२९,१६५
एकूण ३४,२५,९६३ १०,७१,७९०

 


इतर बातम्या
खतांची दरवाढ नाहीपुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही...
खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्रीकोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा...कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख...
पूर्व भारताच्या विकासावर भर ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशाचा पूर्व भाग नेतृत्व करत होता,...
‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक...पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी...
विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पंढरपुरात...सोलापूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना...
बाजारात गर्दी नियंत्रणासाठी नियमांची...नाशिक : कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील...
नेरूर येथे नारळ बागेला आगसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील नेरूर कर्याद नारूर (...
जोरदार पावसाची शक्यतापुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच...
जळगावात बीटी कापसाच्या २५ लाख पाकिटांची...जळगाव :  राज्यात कापूस लागवडीत आघाडीवर...
दर्यापूर बाजार समितीत सोयाबीनला सात...अमरावती : सोयाबीन दरातील तेजीची घौडादौड कायम असून...
मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन घटलेनागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख आणि वनमंत्री संजय...
नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी कृषी...कोल्हापूर : जिल्ह्यात सोयाबीनच्या...
 खानदेशात कांद्याची आवक वाढतच दर दबावातजळगाव :  खानदेशात गेल्या आठवड्यात लाल...
अकोला जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना...अकोला : एकीकडे केंद्र, राज्य शासन लाभार्थ्यांच्या...
प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच... नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी...
दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन...परभणी : दर वाढले म्हणून बियाण्यासाठी राखून...
अवकाळीचा आजपासून अंदाजपुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ...
सोलापुरात वाढत्या उन्हामुळे शुकशुकाटसोलापूर ः सोलापूर शहर जिल्हयात सध्या उष्ष्णतेची...