Agriculture news in marathi, water of 'tembhu', in Atpadi, relief to farmers | Page 2 ||| Agrowon

‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना दिलासा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात बिघाड झाला होता. त्यामुळे ही योजना सुरू करता येत नव्हती. अखेर पंपगृहातील पंपाची दुरुस्ती करून प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ही योजना सुरू झाली. योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यात दाखल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात बिघाड झाला होता. त्यामुळे ही योजना सुरू करता येत नव्हती. अखेर पंपगृहातील पंपाची दुरुस्ती करून प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ही योजना सुरू झाली. योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यात दाखल झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन उन्हाळ्यात ७० दिवस सुरू होते. साधारण दहा जूनच्या दरम्यान कोयनेतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे योजना बंद केली. यानंतर योजनेच्या कालव्यावरील गेट आणि अस्तरीकरणाची कामे हाती घेऊन ती पूर्ण झाली. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये कृष्णा काठाला महापूर आला. दुष्काळी भागाला मात्र हुलकावणी दिली. तालुक्यातील बहुतांशी तलाव कोरडे पडले होते. त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्यातून तलाव भरून द्यावेत, या मागणीने जोर धरला. यासाठी आंदोलनेही झाली. मात्र, महापुराच्या पाण्यात टेंभूचे पंपगृह बुडाल्यामुळे ते खराब झाले. त्यामुळे पंप चालू करून पाणी देणे कठीण बनले. पूर ओसरल्यानंतर पंप दुरुस्तीचे काम सुरू केले. 

पहिल्या टप्प्यात तीन पंप सुरू केले आहेत. हे पाणी घाणंद तलावातून आटपाडी तलावाकडे सोडले आहे. टप्प्याटप्प्याने मोटारीची संख्या वाढवली जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढणार आहे. डाव्या कालव्याला ही लवकरच पाणी सोडण्याचे नियोजन आहे. घाणंद ते हिवतड कालव्यावर जागोजागी गेट आणि अस्तरीकरणाची कामे सुरू आहेत. चार दिवसांत कामे तातडीने संपवून कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन आहे. हे पाणी केवळ मुख्य कालव्याने पुढे न जाता, तालुक्यातील तलाव भरून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

मागणी आणि गरज ओळखून पाणीवाटपाचे नियोजन करण्याची गरज आहे. उन्हाळी आवर्तनात पाटबंधारे मागणी केलेली काही गावे पाण्यापासून वंचित आहेत. उन्हाळ्यात ज्यांना पाणी मिळाले नाही, त्या भागाला प्राधान्याने पाणी सोडावे, अन्यथा मनमानी नियोजन केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

इतर ताज्या घडामोडी
नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घटनांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी...
चिखली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरीअकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी...
आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदीधामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या...
कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ...जालना : ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त...
मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल...नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना...
अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत...सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या...
कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत...कोल्हापूर, सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा दिवसांच्या...
बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाकनाशिक : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी...
परभणी जिल्ह्यात हरभऱ्याची २ हजार ९००...परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य)...
नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०...
शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच...शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या...
बियाणे उद्योगाच्या विकासासाठी स्थितीत...बियाणे उद्योगात आपले राज्य पूर्वीपासून अग्रेसर...
हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन...जळगाव ः उडीद, मुगाची शासकीय खरेदी केंद्रांत...
ढगाळ हवामानामुळे साताऱ्यातील...सातारा  ः अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाचे...
जिल्हा बॅंकांची आर्थिक कोंडी चिंताजनकभूविकास बॅंका मृत्युशय्येवर गेल्यापासून...
प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्जमुंबई ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१...
नगर जिल्ह्यात हमीभावाने शेतीमाल...नगर  ः मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी...
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरसकट...अंबाजोगाई, जि. बीड  : भाजपची मनोवृत्ती...
रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी :...कोल्हापूर  : गेल्या पाच वर्षांत देशातील दोन...