कर्नाटकातील तुबची-बबलेश्वरमधून पाणी भिवर्गी तलावात

जत तालुक्यातील भिवर्गी साठवण तलावात कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतील पाणी आल्याने तुडुंब भरला आहे. साठवण तलाव भरल्याने संख, अक्कळवाडी, भिवर्गी, कोंतवबोबलाद या चार गावांचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.
Water from Tubchi-Bableshwar in Karnataka to Bhivargi Lake
Water from Tubchi-Bableshwar in Karnataka to Bhivargi Lake

सांगली : जत तालुक्यातील भिवर्गी साठवण तलावात कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतील पाणी आल्याने तुडुंब भरला आहे. साठवण तलाव भरल्याने संख, अक्कळवाडी, भिवर्गी, कोंतवबोबलाद या चार गावांचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. द्राक्ष, डाळिंब फळबागांना मोठा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.   

पूर्व भागातील भिवर्गी साठवण तलावाची पाणी साठवण क्षमता ३२५ दशलक्ष घनफूट इतकी आहे. गेल्यावर्षी कर्नाटक सरकारने तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी सोडले होते. तिकोंडी, भिवर्गी साठवण तलाव भरला होता. त्यामुळे या भागातील शेतीला पाणी उपलब्ध झाले असल्याने पाणी टंचाई भासली नव्हती. परंतू शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी या तलावातून पाणी उपसा सुरू असल्याने तलावातील पाणीसाठा संपत आला होता. निम्मा पावसाळा संपत आला तरीसुद्धा दमदार पाऊस न झाल्याने ऑगस्ट महिन्यातील पाणीसाठा २९.५५ दशलक्ष घनफूट इतका व पाणी पातळी ५०४.१० मीटर एवढी होती. तलावाची मृतसंचय खाली पातळी आली होती. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला होता.

सध्या तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी पूर्व भागातील कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या यत्नाळ तलावात सोडण्यात आले आहे. या जालगिरी फाट्यातून ओढा पात्रातून सायफन पद्धतीने पाणी तिकोंडी तलाव ओव्हरफुल होऊन भिवर्गी तलावात येऊन भरला आहे. साठवण तलावा भरल्याने वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटणार आहे. भिवर्गी साठवण तलावाखाली संख, अक्कळवाडी, भिवर्गी, कोंतवबोबलाद या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी आहेत. या गावांचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. उन्हाळ्यात संख येथे टँकरने पाणी पुरवठा सुरू होता.

द्राक्ष, डाळिंब फळबागांना फायदा जत तालुक्याच्या पूर्व भागात डाळिंब आणि द्राक्षाचे क्षेत्र अधिक आहे. दरवर्षी पाणी टंचाईमुळे टॅंकरद्वारे पाणी बागांना द्यावे लागते. गतवर्षी भिवर्गी तलावात तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी देखील भिवर्गी साठवण तलाव भरल्याने तिकोंडी, करजगी, संख, करेवाडी (तिकोंडी) परिसरातील द्राक्ष, डाळिंब फळबागांना मोठा फायदा होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com